MR/Khand_18_2 - Page 13

मुख्यमंत्री Chief Minister महाराष्ट्र Maharashtra

५ मे २०१६ पं

सत्यमेव जयने

शुभेच्छा

महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीतर्फे खंड १८ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे भाग-१, भाग- २ आणि भाग-३ यांचे प्रकाशन करण्यात येत आहे.

या खंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जानेवारी १९४६ ते २० मे १९५६ या कालावधीत ठिकठिकाणी केलेल्या भाषणांचे संकलन आहे. विशेषत: या भाषणांमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभांपासून ते त्यांच्या सत्कारापर्यंतच्या प्रसंगानिमित्त व्यक्त केलेल्या विचारांचा समावेश आहे. ही भाषणे बहुतांशी प्रासंगिक स्वरूपाची असली तरी त्यातून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडतात. त्याचबरोबर या भाषणांमधून त्यांचा प्रचंड व्यासंग आणि सखोल चिंतनाची प्रचिती येते. धम्मासारखा गहन विषयही ते अतिशय सोप्या आणि सुव्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करतात.

मराठी वाचकांसाठी हे खंड विशेष महत्त्वाचा आहेत, कारण यापूर्वी प्रसिद्ध झालेले खंड हे इंग्रजी भाषेत असल्याने काही वाचकांची अडचण होत होती. या खंडाने बाबासाहेबांचे विचार वाचकांना त्यांच्या मातृभाषेतून वाचावयास मिळणार आहेत, हे प्रशंसनीय आहे. अ

£ ¢

(देवेंद्र फडणवीस)