मंत्री, मंत्रालय, मुंबई-४०० ०3२
शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण,
www.maharashtra.gov.in ` उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण,
मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, दिनांक : ११ मार्च २०१६.
महाराष्ट्र शासन
शुभ संदेश
भारतरत्न डां. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, विचार व त्यांची शिकवण
प्रेरणादायी आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व, निकोप विचार व कार्याप्रतीची निष्ठा
यांच्या बळावर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांच्या जीवनात आमूलाग्र
परिवर्तन घडवून आणले. सर्व क्षमतांनिशी जीवनात यशस्वी होण्याची ऊर्मी
त्यांनी निर्माण केली.
भारताच्या सामाजिक व राजकीय संरचनेच्या उद्धारासाठी डॉ. आंबेडकरांनी दिलेले महान योगदान शब्दांत वर्णन करणे कठीण आहे; परंतु त्यांनी आखून दिलेल्या मूल्यांचे प्रामाणिकपणे आचरण करणे आपल्या हातात आहे. जेणेकरून डॉ. आंबेडकरांनी आजीवन ज्या भारताचे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात नक्की साकार होईल.
१९४६-१९५६ या कालावधीत डॉ. आंबेडकरांची भाषणे, त्यांनी वेळोवेळी
व्यक्त केलेले विचार यांचे सार या आपल्या खंडात आपल्या मातृभाषेत मराठीत
मांडलेले आहे. मला खात्री आहे की, वाचकांना, विशेषत: युवकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधून प्रेरणा देण्यास हे पुस्तक मोलाची भूमिका बजावेल. जेणेकरून आपली युवापिढी जीवनात उमेदीने यशस्वी
वाटचाल करू शकेल.
धन्यवाद.
आपला,
EN
yf १! | ति रौँ
( विनोद तावडे )