मानली गेलेली आहेत. सारनाथवे महाबोधी सोसायटीचे मुखपत्र धर्मदूत, नवयुग ही अशीच अधिकृत स्रोत आहेत. बुद्ध की मावस या भाषणाच्या शीर्षकारांबंधी वाद निर्माण झाला होता. काही अभ्याराकांनी व वाचकांनीही याबद्दल लेखी, जाहीर भाषणांद्वारे विचारणा केली होती व आपले आक्षेपही नोंदविले गेले. त्यादृष्टीने शोध घेतला असता, दिनांक ३ आगस्ट १९५७ व्या 'प्रबुद्ध भारल'मध्ये या भाषणाचे वृत्त प्रसिद्ध झाले असून त्यात बाबासाहेबांचे 'बौद्ध धर्म व मार्क्सवाद' या विषयावर भाषण झाल्याचे नोंदविले गेले आहे. त्याचे संग्राहक म्हणून बाबासाहेवांबरोबर खाटमांडू परिषदेला गेलेले प्राचार्य म. भि. चिटणीसांचा उल्लेख आढळतो. बुद्ध व मार्क्स या उर्वरित नियोजित ग्रंथाचा उल्लेख बाबासाहेबांनी 'बुद्ध अन्ड हिज धम्म' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे. त्याचे स्पष्टीकरण खंड 3 च्या प्रस्तावनेत संपादक मंडळाने केले आहे. परिषदेच्या स्मरणिकेत Buddha and "a7 अशा शीर्षकाखाली हे भाषण दिले आहे. 'व' (8१) व (0) 'किंवा' यात खूप फरक आहे. आमच्या रेकॉडप्रमाणे पुराभिलेखमध्ये हे लेखन 'बुद्ध की कार्ल मार्क्स' (Buddha or (९१ |») या नावाने उपलब्ध आहे; परंतु या शीर्षकाचे प्रकरण हे खाटमांडू भाषणाचे नसून ते स्वतंत्र आहे (खंड ३ रा संपादक मंडळाची प्रस्तावना). हा सारा विचार करून या तिसऱया भागातील क्रमांक ३४७ भाषणाच्या शीर्षकात दुरुस्ती करून 'बौद्ध धर्म व मार्क्सवाद' हे मूळ शीर्षक दिले आहे.
छी भाषणे जी लिखित स्वरूपाची आहेत, त्यात बाबासाहेबांचे विचार मुद्देसूद व सर्वकाळ वाचायला मिळतात. उर्वरित भाषणे ही मुख्यत्वेकरून वृत्तांकन असल्यामुळं ती थोडक्यात व अनेकदा प्रासंगिक असल्याने जशी वृत्तांकने प्रसिद्ध झाली आहेत तशीच ती छापली गेली आहेत. वृत्तपत्रांतील लेखनाचे स्वरूप बघता हे वाचकांच्या लक्षात येईल, असे वाटते.
या द्वितीय आवृत्तीसाठी मा. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शुभ संदेश देऊन आमचा उत्साह वाढविला आहे. त्यांचे आभार. समितीचे अध्यक्ष तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुभ संदेश दिला व या कार्याला चालना दिली त्याबद्दल त्यांचे आभार. या कार्यासाठी तत्कालीन प्रधान सचिव डॉ संजय
( वीस )