२७-१२-१९४५ आपले ध्येय साकार करण्यासाठी फेडरेशनला अपूर्व विजय मिळवून ह्या - Page 630

५९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. तुम्हा सर्व लोकांनी असा निर्धार केला पाहिजे की, याउपर आम्ही कोणाचेही वर्चस्व स्वतःवर लादून घेणार नाही. आमच्यावर कोणीही राज्य करता कामा नये. आम्ही शासनकर्ते होणार आहोत आणि याच निर्धारानुसार वागून आपल्या फेडरेशनला अपूर्व विजय मिळवून दिलात तर आपले ध्येय आपण लवकरच हस्तगत करू.