MR/Khand_18_3 - Page 15

मंत्री, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण,

www. maharashtra.gov.in उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण,

मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, दिनांक : ११ मार्च २०१६. महाराष्ट्र शासन

शुभ संदेश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, विचार व त्यांची शिकवण प्रेरणादायी आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व निकोप विचार व कार्याप्रतीची निष्ठा यांच्या बळावर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. सर्व क्षमतांनिशी जीवनात यशस्वी होण्याची ऊर्मी

त्यांनी निर्माण केली.

भारताच्या सामाजिक व राजकीय संरचनेच्या उद्धारासाठी डॉ. आंबेडकरांनी. .दिलेले महान योगदान शब्दांत वर्णन करणे कठीण आहे; परंतु त्यांनी आखून दिलेल्या मूल्यांचे प्रामाणिकपणे आचरण करणे आपल्या हातात आहे. जेणेकरून डॉ. आंबेडकरांनी आजीवन ज्या भारताचे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात नक्की

साकार होईल.

१९४६-१९५६ या कालावधीत डॉ. आंबेडकरांची भाषणे, त्यांनी वेळोवेळी

व्यक्त केलेले विचार यांचे सार या आपल्या खंडात आपल्या मातृभाषेत मराठीत मांडलेले आहे. मला खात्री आहे की, वाचकांना, विशेषतः युवकांना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधून प्रेरणा देण्यात हे पुस्तक मोलाची भूमिका बजावेल. जेणेकरून आपली युवापिढी जीवनात उमेदीने यशस्वी

वाटचाल करू शकेल.

धन्यवाद.

.आपला,.

र श्र )

ia ७ शा ft “ile रै

( विनोद तावड़े )