MR/Khand_18_3 - Page 23

भाषण सारनाथ येथील मूलगन्ध कुटी विहाराच्या मैदानात झाले. भिक्खू धर्मरक्षिताने या घटनेचा संदर्भ भगवंताच्या पाहिल्या प्रवचनाशी जोडला आहे, हे विशेष !

संपादकाने ही सर्व भाषणे मुख्यत: बाबासाहेबांनी चालविलेल्या मुखपत्र 'जनता'लून घेतल्याचे नमूद केले आहे व त्या-त्या भाषणाचा स्रोतही दिला आहे. या खंडाच्या तीन भागात कालानुक्रमे ते मांडले आहेत. त्यापैकी ३४ भाषणे भाग पहिल्यात, दुसऱ्या भागात ९१, तिसऱया भागात ७० असे एकूण तीन भागात २१८ भाषणे 'जनता'मधून घेतली आहेत. १९३० ते १९५६ पर्यंत चालविलेले 'जनता' हे सर्वात दीर्घकाळ चाललेले आंबेडकरी पाक्षिक आहे. त्यामुळे साहजिकच आंबेडकरी चळवळीचा तो इतिहास आहे. या पाक्षिकाचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज आहे. इतर २२ भाषणे ही बहिष्कृत भारत, १ माषण 'मूकनायक' यातून घेतली आहेत. १९२० ते १९३० या काळातील ही मुखपत्रे असल्यामुळे या प्रारंभीच्या काळातील बाबासाहेबांचे विचार व तत्कालीन चळवळीचे चित्र सतत पाहावयास मिळते. 'जनता' व 'मूकनायक' ही दोन महत्त्वाची साधने या खंडासाठी उपयुक्त ठरली आहेत. उर्वरित समकालीन वृत्तपत्रे, नियतकालिकांतील बाबासाहेबांची भाषणे, विविध मासिके, वृत्तपत्रे, चारित्रातील लेख यांसारख्या माध्यमांतून घेतली आहेत; त्याचा तपशील येणेप्रमाणे विविधवृत्त-३, चित्रा-१, नवयुग-१, नवाकाळ-१, लोकयुद्ध-१, अरुण-१, दलित बंधू-३, गरुड-१०, ज्ञानप्रकाश-३, समता-२, निभीड-१, मा. फ. गांजरे- ७, एच. एल, कासारे-३, बी. सी. कांबळे-२, खैरमोडे खंड-१२, कीर धनंजय- ३, भिक्षू संभव-२, धर्मदूत-४, वसंत मून-२, रमेश शिंदे-१, शा. शं. रेगे-१, अस्मितादर्श-१, शंकरराव होतोले-२ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड-१३, खंड २-१, प्रबुद्ध भारत-१४ या स्रोतांमधून भाषणे व संदर्भ घेतले आहेत. यात काही संदर्भ एकाच भाषणाचे दोन दिले आहेत.

या भाषणाचे स्रोत शोधताना दोन प्रकारचे स्रोतांचा उपयोग संपादक मंडळाने केलेला आहे. एक बाबासाहेबांची वृत्तपत्रे ही अधिकृत स्रोत म्हणून मानली गेलेली आहेत. सारनाथचे महाबोधी सोसायटीचे मुखपत्र धर्मदूत,

( एकोणीस )