BE डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
महार समाजाचे ऐतिहासिक महत्वपूर्ण स्थान लक्षात घेता अशा स्वरुपाची प्रथा प्रचलीत होती हे खालील पुराव्यावरून सिद्ध होते--
संपादक्त.
" कोकणातील महार यांचे एकेकाळी स्वतंत्र राज्य होते. त्यांना आर्यादी लोकांनी जिंकून त्यांच्यावर इतक्या शरणागतीच्या अटी लादल्या की, त्यांना बंडाला प्रवृत्त होण्यास तिळभरही वाव मिळू नये. या ऐतिहासिक घटनांचे ऐतिहासिक ठसे म्हणजे महारांना कोकणातील गावांत फार मानाचे व महत्त्वाचे स्थान देण्यात आले. ते हजारो वर्षे टिकून राहिलेले आहे. महारांना दिलेले “ भूमिपुत्र ' हे नाव कोकणात चालू आहे. ' गावची देवस्की महारांच्याच हातून पुरी करण्यात येते. महारांनी देव-देवतेला हाका मारून जागे करावे लागते. त्यांची काठी बसल्याशिवाय देवदेवतांच्या अंगात देवपण येत नाही. ' देवचार ' म्हणून एक देवता कोकणात आहे. तिला शांत करण्यासाठी जो विधी करावा लागतो तो महाराला घोंगडी व अन्न दिल्याशिवाय पुरा होत नाही आणि देवता संतुष्ट होत नाही. गावातील देवदेवतांपुढे गाऱ्हाणे घालावयाचे असले तर मराठे वगैरे स्पृश्य गावकऱ्यांना महारापुढे दाती तृण धरून विनवण्या कराव्या लागतात. आणि महारांनी देवदेवतांपुढे गाऱ्हाणी घातली तरच देवदेवता नवसाला पावतात, असा हजारो वर्षांचा रिवाज आहे. यावर सुशिक्षित व अशिक्षित कोकणस्थांचा विशवास असे. “ `
महाराष्ट्रातील महार समाज व त्याचे ऐतिहासिक आणि सद्यःस्थितीत असलेले स्थान दर्शविणारे चित्रण ' महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर ' मध्ये खालील प्रमाणे केले आहे.
१ : खैरमोडे. खंड ३ पृ. १५.