परिशिष्ट-२३
नालंदा विद्यापीठ
नालंदा बिहार राज्यातील सुप्रसिद्ध प्राचीन बौद्ध अवशेषांचे एक स्थळ. ते
गंगेच्या काठी पाटण्याच्या आग्नेयीस सु. ७० कि.मी. वर व राजगीरच्या उत्तरेस
११.२७ कि.मी. वर बडगाव नामक खेड्याच्या परिसरात वसले होते. नालंदा
हे प्राचीन विद्यापीठ म्हणून भारतात ख्यातनाम होते. प्राचीन वाड्मयात नालंदाची
जल, नालक, नालकग्राम, नालँद वगैरे भिन्न नामांतरे आढळतात. नालंदा या
नावाविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. नालंदा याचा अर्थ (न + अलम्
+ दा = पुरेसे देऊ न शकणारी) असा करण्यात येतो.
प्राचीन वाड्मयीन पुराव्यानुसार नालंदाची प्राचीनता मौर्यकाळातील अशोकाच्या
साम्राज्यापर्यत जाते; तथापि या स्थळाची भरभराट इसवी सनाच्या पाचव्या |
सहाव्या शतकांपासून पुढे झाली आणि हर्षवर्धन व पाल राजे (आठवे ते बारावे
शतक) यांचा उदार आश्रय येथील विद्यापीठास मिळाला. कनिंगहॅम यांनी या
स्थलाचा शोध १८७१ मध्ये लावला; पण प्रत्यक्ष उत्खनन मात्र १९१६ पासून पुढे कित्येक वर्षे करण्यात आले. यात अनेक मंदिरे, विहार, स्तूप, मुद्रा व ब्राँझच्या मूर्ती सापडल्या. अनेक पायऱ्या असलेली उत्तुंग मंदिरे, मधे चौक व भोवताली व्हरांडा आणि अनेक खोल्या असलेले अनेक विहार आणि सभागृहे यांवरून प्राचीन विद्यापीठीय जीवनाची कल्पना येते. या इमारतीचे स्तंभ आणि भिंती कलात्मक चित्रांनी व कोरीव कामाने सजविलेल्या होत्या. विद्यार्थ्यांचे जीवन कसे होते, यावर प्रकाश टाकणारा पुरावाही येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. विहार अनेक वेळा आगीच्या भक्षस्थानी पडल्याचा पुरावाही निळतो. सुमात्राच्या राजाच्या विनंतीवरून देवपाल राजाने (नववे शतक) विहारांना गावे इनाम दिल्याचा ताम्रपट सापडला आहे. नालंदा विहाराच्या तसेच खाजगी व श्रेणींच्या मुद्राही बऱ्याच मिळाल्या आहेत. अनेक स्तूपांत बौद्ध मठ व धार्मिक ग्रंथांचा मजकूर असलेल्या मृप्मुद्राही हाती आल्या आहेत.
नालंदा विद्यापीठ प्राचीन भारतातील एक आदर्श विद्यापीठ, बिहार राज्यातील राजगीरच्या उत्तरेस ११.२७ कि.मी, अंतरावर हे विद्यापीठ होते. त्याची स्थापना इ.स. पाचव्या शतकाच्या सुरुवातीस झाली असावी. याचे श्रेय बौद्ध आचार्य