२०-१०-१९२७ बहिष्कृत विद्यार्थ्याच्या कर्तव्यावरच हिष्कृतांचे भवितव्य - Page 103

१३ |
बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या कर्तव्यावरच बहिष्कृतांचे
भवितव्य

बहिष्कृत विद्यार्थ्यांचे चतुर्थ वार्षिक सामाजिक सम्मेलन पुणे येथे बहिष्कृतांचे सुप्रसिद्ध पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर, बार-अँट-लॉ यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, ता. २ ऑक्टोबर १९२७ रोजी उत्साहाने पार पडले. समारंभासाठी डी. सी. मिशनचा अहिल्याश्रम हॉल सुशोभित केला होता. सम्मेलनाचा कार्यक्रम शनिवार व रविवार असे दोन दिवस ठेवण्यात आला होता. शनिवारी विद्यार्थ्यांच्या संभाषणाचे व खेळांचे सामने झाले. या सामन्यात महार, मांग व चांभार या वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, हे नमूद करण्यास आनंद वाटतो. संभाषणात व खेळात बक्षीसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी ५ वाजता होणार होता. त्यासाठी नियोजित अध्यक्ष व बहिष्कृतांचे पुढारी. डॉ. भीमराव आंबेडकर, बार-अँट-लॉ हे डॉ. सोळंकी, कदम वगैरे मंडळीसमवेत ५ वाजता येऊन दाखल झाले. अध्यक्षांच्या स्वागतासाठी गव्हर्नमेन्ट डी. सी. हॉस्टेल व डी. सी. मिशन या संस्थांच्या बालवीरांची पथके दारापाशी सज्ज होऊन राहिली होती. दरवाजापाशी अध्यक्ष येताच सुभेदार घाटगे यांच्या आधिपत्याखालील बालवीरांच्या पथकानी त्यांना खडी ताजीम दिली. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या जयजयकाराचा प्रचंड ध्वनी निघाला आणि या जयजयकारातच पाहुणे मंडळी आश्रमात येऊन दाखल झाली. नंतर उपहार | आटोपल्यावर अध्यक्ष, विद्यार्थी व काही निमंत्रित पाहुणे यांचा ग्रुप फोटो घेण्यात आल्यावर ६ वाजता. बक्षीस समारंभ सुरू झाला. |

पाहुणे मंडळीत डॉ. सोळंकी, प्रि. तावडे, रा. श्रीधरपंत टिळक, रा. संगमनेरकर, कदम, ऐदाळे, बाराथ, भंडारे, राजभोज, लांडगे, वायदंडे, डी. सी. मिशनचे रा. पाताडे, सुभेदार घाटगे बंधु, गायकवाड, तसेच सेवासदनातील प्रौढ विद्यार्थिनी, ट्रेनिंग कॉलेजचे प्रौढ विद्यार्थी वगैरे मंडळी प्रामुख्याने दिसत होती. नंतर जॉ. सेक्रेटरी रा. रणपिसे यांनी निरनिराळया सामन्यातील बाबींचे मार्मिक विवेचन केले आणि अध्यक्षांनी स्वहस्ताने यशस्वी उमेदवारास बक्षीसे वाटली. नंतर अध्यक्षांनी आपले भाषण केले. त्यात त्यांनी बहिष्कृत वर्गाच्या सध्याच्या भयानक

बहिष्कृत भारत : ४ नोव्हेंबर १९२७.