१८
अस्पृश्य असूनही अस्पृश्यांच्या चळवळीत
सहभागी न होणे लांछनास्पद
महाड येथील तारीख २५ ते २७ डिसेंबर १९२७ च्या सत्याग्रह परिषदेच्या कार्यक्रमाने तेथील चांभार समाजदेखील खडबडून जागा झाला व दि. २७ डिसेंबर १९२७ ला संध्याकाळी चांभारवाड्यात सभा करण्याचे ठरवून, डॉ. आंबेडकरांना तेथे येण्यास विनंती करण्यात आली. त्यांच्या विनंतीस मान देऊन डॉ. आंबेडकर त्यांच्या मित्रमंडळीसह रात्री साडेसात वाजता चांभार- वाड्यात .गेले. महाड येथे चांभारांची वस्ती बरीच मोठी आहे व त्या मानाने सभेस चांभार वर्गातील स्त्रीपुरुषांचा घोळका बराच जमा झाला होता. प्रथमत: श्रीयुत रा. ना. वनमाळी, रा. गिरजाशंकर शिवदास, एल. आर. चांदोरकर, श्रीयुत गोविद झिपरू जाधव यांची सामाजिक विषयांवर स्फुर्तीदायक भाषणे झाल्यानंतर डॉ. आंबेडकरसाहेब बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले,
- दोन चार चांभार. लोक सोडून बाकीचे कोणीच चांभार लोक सत्याग्रहार्सारख्या महत्त्वाच्या कार्यात भाग घेत नाहीत ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. मला याचे काही कारण समजत नाही. महार समाजाशी सहकार्य करण्यास तुम्ही फा कचरता, हे मला कळत नाही. तुम्ही स्वतः होऊन सत्याग्रहासारखे मोठे कार्य करू म्हटले तर ते तुम्हास झेपणार नाही असे मला वाटते. कारण तुमची लोकसंख्या अगदी अल्प आहे. तेव्हा महार लोकांसारख्या बहुसंख्यांक लोकांशी कार्यक्षमतेच्या दृष्टीने सहकार्य केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तसेच महार लोकांशी सहकार्य केल्याने आपली जात बाटेल अशी भीती बाळगण्याचे तुम्हास काही कारण नाही. खरे म्हटले असता सत्याग्रहीचा कंपू हा वीरांचा कंपू आहे व वीरांच्या कंपूत जातीपातीला थारा नाही ही गोष्ट पेशव्यासारख्या ब्राह्मणी राज्यातही मान्य होती. तसे जर नसते तर सिदनाक महाराचा तंबू मराठे सरदारांच्या छावणीत राहू दिला नसता. तरी पण तुम्ही आपली जात मोडा असा कोणीही आग्रह धरीत नाही. खरे म्हटले असता तुम्ही सुखवस्तु, व्यापारी, सधन आहा. तुम्ही उलटी आम्हास मदत केली पाहिजे, तुम्हास जोडे न देण्याचा
बहिष्कृत भारत : ३ फेब्रुवारी १९२८.