२४
आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण
स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही
तारीख २३ मार्च १९२९ रोजी मु. बेळगाव येथे दिवसा ४ वाजता बेळगाव जिल्हा बहिष्कृत वर्गाची सामाजिक परिषद भरली होती ! तिचे नियोजित अध्यक्ष अस्पृश्य वर्गाचे सुप्रसिद्ध पुढारी श्री. सीताराम नामदेव शिवतरकर हे श्री. कोंडदेव श्रीराम खोलवडीकर यांच्यासह ता. २२-३-१९२९ रोजी सव्वादहाच्या मेलने बेळगावास उतरले. या प्रसंगी परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. डी. आर. इंगळे हे अस्पृश्य लोकांसमवेत सामोरे आले. अध्यक्षांचा सत्कार करून त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून जयजयकार करण्यात आला. नंतर उत्तम शृंगारलेल्या गाडीतून श्री. खोलवडीकरासह अध्यक्षांची मिरवणूक, कलभाट रस्ता, लष्कर, हजाम गल्ली, कंगराळ गल्ली, दरबार गल्ली आंणि चबाट गल्लीतून कर्नाटक बहिष्कृत विद्यार्थी आश्रम बेळगावपर्यंत आणण्यात आली. या प्रसंगी अस्पृश्य वर्गातील हुनर्गे येथील बँडवाले यांनी आपल्या बँडवादनाने लोकांना तल्लीन केले व मिरवणूक ११ वाजता अस्पृश्यांचे बोर्डीग होस येथे आली. नंतर संध्याकाळी सहा वाजता श्री. डी. आर. कांबळे यांच्या घरी अध्यक्ष वगैरे मंडळीस चहा पार्टी देण्यात आली.
ता. २३ मार्च १९२९ रोजी शनिवारी परिषदेच्या कामास बेळगाव येथील विद्यार्थी आश्रमाच्या आंबराईत दुपारी चार वाजता सुरवात झाली.
प्रथमारंभीच विषय नियामक कमेटी बसून ठरावाचा मसूदा तयार करण्यात आला होता. या प्रसंगी अस्पृश्य वर्गाच्या सुधारणेकरिता नेमलेल्या स्टार्ट कमेटीचे सभासद डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सोलंकी, मेसर्स जानवेकर, देशपांडे, रावसाहेब चिकोडी, रावसाहेब थोरात तसेच रा. मराठे, रा गजेंद्रगडकर, नागगौडा इत्यादि बेळगावातील स्पृश्य पुढारी याजप्रमाणे रा. कोंडदेव खोलवडीकर, दत्तोपंत पवार, डॉ. रमाकांत कांबळे, रा. यशवंतराव पोळ आणि रामाप्पा कांबळे, धर्मानना सांब्राणी इत्यादी अस्पृश्यांचे पुढारी हजर होते.
(२) आरंभी ईशस्तवन व अध्यक्षांच्या स्वागतपर गायन झाले. या प्रसंगी स्वागताध्यक्ष यांचे अगदी मननीय, प्रतिपक्षास चीत करणारे असे सडेतोड भाषण
बहिष्कृत भारत : २९ मार्च आणि १२ एप्रिल १९२९.