१९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ह्या परिषदेबरोबर सामाजिक, महिला, युवक व शिक्षणविषयक परिषदा घेण्यात आल्या. हे कार्यक्रम १० ऑगस्टला घेण्यात आले. सामाजिक परिषदेचे अध्यक्ष पां. ना. राजभोज व स्वागताध्यक्ष दशरथ पाटील होते. महिला परिषद पुण्याच्या सौ. गुणाबाई गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महिला परिषदेच्या स्वागताध्यक्षा सौ. शेवंताबाई ओगले, अमरावती आणि सेक्रेटरी सौ. तुळसाबाई बनसोडे पाटील, नागपूर, सौ. जाईबाई चौधरी, नागपूर व सौ. काशीबाई
HSR, अकोला ह्या होत्या. युवक परिषदेचे अध्यक्ष लखनौचे
अँड. शीवदयालसिंग चौराशिया आणि स्वागताध्यक्ष राघवेन्द्रराव बोरकर होते.
दलित काँग्रेस परिषदेचे महत्त्व
१९३० मध्ये नागपूरला झालेल्या अ. भा. दलित काँग्रेस परिषदेला दलित वर्गाच्या उत्थानाच्या चळवळीत एक विशेष राजकीय ऐतिहासिक महत्त्व आहे. पहिली गोष्ट, भारतातील सर्व अस्पृश्य समाज एका छत्राखाली येऊन अखिल भारतीय पातळीवर भरविण्यात आलेले दलित काँग्रेसचे हे पहिलेच अधिवेशन होय! दुसरी गोष्ट, अस्पृश्य वर्गाच्या पुढाऱ्यांनी डॉ. आंबेडकरांचे एकमेव नेतृत्व प्रथमतःच मान्य करून आपल्या राजकीय मागण्या भारतीय स्तरावर एकमुखाने समोर ठेवल्या. तिसरी गोष्ट, विलायतेस होणाऱ्या राऊंड टेबल परिषदेकरिता अस्पृश्य समाजाचे एकमेव नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची एकमताने निवड केली गेली. चवथी गोष्ट, दलित वर्गाची अखिल भारतीय संघटना कायम करण्यात आली आणि पाचवी गोष्ट, या परिषदेत बहिष्कृत वर्गाच्या भावी राजकीय जीवनाचा ध्येयधोरणात्मक मूलभूत पाया घातला गेला. सारांश, माणुसकीस मुकलेल्या ह्या बहिष्कृत भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील इतिहासाचे पहिले पान दलित काँग्रेसच्या अधिवेशनाने लिहिले
गेले!
| समाजाचे शतशः धन्यवाद !
ज्या समाज पुढाऱ्यांनी व समाज कार्यकर्त्यांनी आणि सेवकांनी ह्या दलित काँग्रेसच्या अधिवेशनाची धुरा सांभाळली नि बहिष्कृत वर्गाच्या राजकीय क्रांतीला प्रथमतः चालना दिली आणि सामाजिक जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्याकरिता संघटीत पाऊल उचलले, त्यांचे या समाजावर अनंत उपकार आहेत. आत्मोद्धाराच्या आंदोलनातील पहिले संघटीत पाऊल डॉ. आंबेडकरांच्या प्रभावी नेतृत्वाखाली १९३० साली दलित काँग्रेसने या अधिवेशनाद्वारे प्रथम टाकले.
परिषदेतील ठराव
अ. भा. डिप्रेस्ड क्लासेस काँग्रेसच्या १९३० च्या नागपूर अधिवेशनात पास झालेले ठराव खालीलप्रमाणे आहेत :-
१. ही काँग्रेस असे नि:संदिग्ध जाहीर करते की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा जो विचार जाहीर केला आहे, तो भारताच्या हितसंबंधाला