एकसंध भारत आभचे ध्येय आहे १९९
पापपुण्यामुळे ठरते आणि म्हणून एखाद्याचे शील कितीही उज्वल असले किंवा त्याने कितीही मोठी पात्रता मिळविली तरी जन्मामुळे प्राप्त झालेल्या त्याच्या सामाजिक स्थितीत काहीच बदल होऊ शकत नाही. या सरंजामशाहीचे असे तत्त्व आहे की, एकदा ब्राह्मण म्हणून एखादा जन्मला की तो ब्राह्मणाशिवाय दुसरे काही असू शकत नाही. आणि परिया काहीही झाले तरी परियाच राहतो. या काही रिकामटेकड्या गप्पा नव्हेत. तर सध्या अस्तित्वात असलेले ते धर्ममत आहे. अशाप्रकारच्या लोकांच्या हातात अनिर्बंध सत्ता देणे म्हणजे फाशी देणाऱ्याच्या हाती सुरीही देण्यासारखे आहे.
६. अशा प्रकारची मते बाळगल्याबद्दल आपण जातीयवादी व देशाचे शत्रू आहोत, असे बहुधा निर्दयपणे घोषित करण्यात येते. प्रत्येक देशात राज्य शासनाची सूत्रे सुशिक्षित वर्गाच्या हातात असतात व समर्थ शासनाच्या दृष्टीने ती तशीच असावीत, असे पुनःपुन्हा सांगताना काँग्रेसवाले कधीच थकत नाहीत. भविष्यात आमचे कोणीही मालक बनोत, परंतु ते या सरंजामदारांच्या हातात शासन सत्ता देताना सामाजिक व राजकीय प्रश्न या दोन वेगवेगळ्या बाबी असून त्याचा परस्परांशी काही संबंध नाही, असा विचार बाळगून असल्याचे दिसतात. संद्गृहस्थहो, मानवी जीवनासंबंधी अशा प्रकारच्या यांत्रिक कल्पनांद्वारे मार्गच्युत करण्याचा प्रयत्न करणाराबद्दल तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. अशा प्रकारच्या चोरट्या प्रयत्नांपासून तुम्ही सावध झालात तर तुम्हाला दिसून येईल की, व्यक्तीला तिच्या स्वभावजन्य इतर गुणांविरहित केवळ राजकारणासाठी वेगळे काढता येऊ शकत नाही. जेव्हा एखादा माणूस राजकारणी या नात्याने मते मागावयास येतो तेव्हा तो आपला कोट काढून ठेवावा त्याप्रमाणे त्याची मते, हितसंबंध व आपली वृत्ती खुंटीवर टांगून ठेवून व स्वच्छ कोरा होऊन काही येत नाही, तर त्याचे व्यक्तिमत्व, वृत्ती इत्यादी सर्व बाबी सोबत घेऊनच तो मते मागावयास येत असतो. सरंजामदार वर्गाची बुद्धी ही देशाची फार मोठी मालमत्ता आहे. परंतु या बुद्धीमुळे त्यांना शासनाचा स्वयंसिद्ध अधिकार मिळालाच पाहिजे, असे नाही. हा अधिकार शीलावर व या बुद्धीचा उपयोग ते कसा करणार आहेत यावर अवलंबून असतो. आपण केवळ कार्यक्षमतेकडे ध्यान दिले पाहिजे. कारण, अडिसन म्हणतो की, "एखाद्याच्या बुद्धीने समाजाचे कसे हित किंवा अहित होत आहे याचा फारसा विचार न करता जर लोक त्यांच्या पात्रतेबद्ल आदर बाळगत असतील तर यापेक्षा समाजाला अन्य मोठी घातक गोष्ट असू शकत नाही. बुद्धीच्या या नैसर्गिक देणगीचा व कलात्मक सिद्धीचा उपयोग सदगुणांच्या विकासासाठी होत असेल व सभ्यतेला बाध आणीत नसेल तरच ती