मालिकेतील अनेक खंडांच्या आवृत्त्या आज संपलेल्या आहेत. आम्ही त्यांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित करण्याच्या कामाला सुरूवात केलेली आहे. भारतरत्न
आणि बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाच्या प्रती हातोहात संपत
असतात. देश विदेशांतून या ग्रंथांना मोठी मागणी असते. यातून शासनाला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलनही प्राप्त होते.
आज देशात केंद्रिय पातळीवर संविधान समिक्षा आणि शिक्षणाचे ब्राह्मणीकरण
यातून घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचा प्रयत्न चालू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन म्हणजे परिवर्तनवादी चळवळींचे ऊर्जाकेंद्र होय. प्रतिगामी, जातीयवादी आणि धर्माध शक्ती आक्रमकपणे उचल खात असताना, देशात प्रतिक्रांतीसदृश्य वातावरण असताना, बाबासाहेबांची ही भाषणे युवापिढीला नवी ` चेतना देतील आणि क्रांतीसन्मुख बनवतील असा विश्वास वाटतो. आपल्या
प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
कृपया कळावे, कळवावे.
आपला स्नेहांकित,
ine
<
' (हरी नरके)
सदस्य - सचिव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने
प्रकाशन समिती, मुंबई.
(एकवीस)