MR/Khand_18_1 - Page 24

या खंडाची हाताळण्यास योग्य अशा तीन भागांत, सुस्पष्ट अक्षरांत व सर्वतोपरी आकर्षक पद्धतीने छपाई केल्याबद्दल तसेच वेळोवेळी आम्हाला मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल शासकीय मुद्रण संचालनालयातील उप संचालक, श्री. उत्तम सोनावणे आणि शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर येथील प्रभारी व्यवस्थापक श्री. रुपेंद्र मोरे, आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक आभार.

या समितीचे कार्य ज्या विभागातून चालते त्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय येथील प्रधान सचिव श्रीमती चंद्रा अय्यंगार, उप सचिव श्री. मु. ध. अंबादे व कार्यासन अधिकारी श्रीमती सं. अ. घोरपडे यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे, त्यांनी वेळोवळी समितीला आवश्यक असणाऱ्या शासकीय गोष्टींची पूर्तता केल्याने व त्यांना खंड प्रकाशनाच्या असलेल्या ओढीमुळे शासकीय अडथळे दूर होऊन आम्हाला मोलाचे सहाय्य झाले याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. एस. एन. पठाण आणि सहसंचालक डॉ. अ. दा. सावंत यांच्या मौलिक सहकार्यामुळेच आमचे काम सुरळीतपणे चालू असते.

आमच्या कार्यालयातील कर्मचारी सौ. सुमित्रा मारूती नेवरेकर, सौ. शलाका शैलेंद्र तांबे, श्री. कमलाकर नीलवर्ण, श्री. मारूती पाडावे व श्री. विजय अनंत वैद्य यांनी टंकलेखन, पत्रव्यवहार इत्यादी बाबींत परिश्रम घेऊन या खंडाच्या निर्मितीत सहाय्य केले.

मा. मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख यांनी या ग्रंथाला दर्जेदार प्रस्तावना लिहून दिली. मुख्यमंत्री सचिवालयातील उप सचिव आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक श्री. भूषण गगराणी हे साहित्यप्रेमी आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवरील प्रेमापोटी ते समितीला सर्व प्रकारचे सहकार्य नेहमीच देत असतात. त्यांच्या विभागातील संचालक श्री. प्रल्हाद जाधव, उप संचालक श्री. भि. म. कौसल यांचेही सहकार्य आम्हाला मिळत असते

उप मुख्यमंत्री ना. छगन भुजबळ, अर्थ मंत्री ना. जयंत पाटील, राज्यमंत्री श्री. अनिस अहमद, खासदार रामदास आठवले आणि खासदार प्रकाश आंबेडकर आदी मान्यवसंचेही आम्हाला सदैवं सहकार्य असते. वित्त विभागातील सह सचिव श्री. सुरेश गायकवाड यांच्या सहकार्यामुळे समितीच्या कामांना गती येते, यासर्वाचे आम्ही कृतज्ञ आहोत.

या खंडासाठी आम्हाला अनेकांचे सहाय्य झाले, त्या सर्वांचे आभार.

कालवश वसंत मून यांनी नियोजन आणि संकलन केल्यानुसार ही ग्रंथमालिका पूर्ण करण्यासाठी वाचकांच्या सहभागाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. या

(वीस)