२९-१-१९३२ देशाच्या ऐक्यासाठी संघटना आवश्यक - Page 318

२७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदू प्रतिनिधीमध्ये अस्पृश्यांबाबत खरे व स्पष्ट बोलावयाचे जे धेर्य नव्हते, ते मला मुसलमान प्रतिनिधींमध्ये दिसून आले. त्यांच्या सहकार्याविषयी मला केव्हाही आदरच बाळगला पाहिजे. हिंदुस्थानच्या ऐक्यासाठी आपण सर्वांनी संघटनेच्या बळावर आपल्या कार्याची रूपरेषा आखली पाहिजे

हा स्वागताचा समारंभ होण्यापूर्वी चर्मकार समाजातील मि. पी. बाळू राजभोज काजरोळकर, पवार वगैरे मंडळी डॉ. आंबेडकरांना बोटीवर जाऊन भेटली. त्यांनी डॉ. आंबेडकरांना हारतुरे घालून त्यांचा सन्मान. केला. मि. पी. बाळू त्यांचे स्वागत करताना म्हणाले की, डॉक्टर साहेब, आपण आपल्या ` अस्पृश्य समाजाचे खरे हितचिंतक पुढारी आहात. आपल्या राऊंड टेबल परिषदेमधील धडाडीच्या व अपूर्व कामगिरीबद्दल आम्हाला धन्यता वाटत आहे. डॉ. आंबेडकरांना ह्या स्वागताबद्दल एक प्रकारचा आनंद झाला. त्यांनी त्यांचे अंत:करणपूर्वक आभार मानले. याशिवाय . शेठ शंकरराव परशा रा. ब. सी. के. बोले, शेठ मनियार वगैरे इतर समाजातील पुढाऱ्यांनीही डॉक्टरसाहेबांचे स्वागत केले: तसेच अस्पृश्य समाजातील डॉ. सोळंकी

एन. टी. जाधव, श्री. वनमाळी, श्री. संभाजी गायकवाड, गुडेकर, चांदोरकर, श्री. शिवरामं जाधव, श्री. नेवरीकर, दिवाकर पगारे बंधु, जाधव, श्री. गणपतबुवा, श्री. वराळे, पुण्याचे सुभेदार घाडगे, नाशिकचे श्री. रणखांबे, गायकवाड, काळे, रोहम, बापूसाहेब दाणी, श्री. पतीतपावनदास वगैरे मंडळी हजर होती.

बॅलर्ड पियरच्या सकाळच्या स्वागत समारंभामध्ये समता सैनिक दलाने विशेष कामगिरी केली आहे. दलाचे सर्वाधिकारी श्री. वडवळकर व सेक्रेटरी आणि उपाध्यक्ष श्री. साळवे व 'लोटेकर यांनी या कामी सैनिक दलासह बरीच मेहनत घेतली होती. डॉ. आंबेडकरांनी मौ. शौकत अलींबरोबर मिरवणुकीने जाण्याचा कार्यक्रम जरी आयत्यावेळी ठरला होता तरी हा मिरवणुकीचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला. उभय पुढाऱ्यांचे व मिरवणुकीचे फोटो घेण्यासाठी मोल स्टेशनवर फोटोग्राफर्सची बरीच गर्दी जमली होती. ही अस्पृश्य व मुसलमान समाजाची संयुक्त मिरवणूक ders पियरवरून, जी. पी. ओ. मार्गाने माकेट, अब्दुल रहिमान स्ट्रीट, पायधुणी गार्गाने भायखळा रोड येथील खिलापत ऑफीसपर्यंत आली. खिलापत जाँफिसात डॉ. आंबेडकरांचे सन्मानाने स्वागत केल्यावर डॉ. आंबेडकर शौकत अलींचा निरोप घेऊन परळला निघाले. परळपर्यंत त्यांची मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली. डॉ, आंबेडकर परळ येथील आपल्या ऑफिसात सुमारे १०.३० वाजता येऊन पोहचले

परळ येथे अगोदरच इतर अस्पृश्य समाजातील मंडळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेली होती. त्यांच्या स्वागताचा स्वीकार केल्यानंतर सायंकाळी सात वाजे पर्यत त्यांनी निरनिराळ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या व पुढाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

७ ७ ७