२९-१-१९३२ देशाच्या ऐक्यासाठी संघटना आवश्यक - Page 317

दैशाच्या ऐक्यासाठी संघटना आवश्यक २७५

मंडळीबरोबर राऊंड टेबल परिषदेसंबंधी थोडासा विचारविनिमय झाला. नंतर डॉ. आंबेडकर यांनी बोटीवरील आपले काही मामुली काम केल्यावर ते व मौ. शौकत अली स्वागतासाठी तयार केलेल्या हॉलमध्ये आले. त्यावेळी त्यांच्या जयजयकाराने तेथले वातावरण पुन्हा दुमदुमून गेले. डॉ. आंबेडकर व मौ. शौकत अली यांचे उभयपक्षाकडून स्वागत झाले असे म्हणावयास काहीच हरकत नाही. तशीच विलायतेमधील राऊंड टेबल परिषदेच्या कार्यात मुसलमानांनी डॉ. आंबेडकर यांना जी एक प्रकारची मदत केली होती त्यामुळे मौ. शौकत अलीचेही स्वागत त्यांनी केले आणि मुसलमान समाजानेही डॉ. आंबेडकरांचे स्वागत केले. हा अस्पृश्य (हिंदू) व मुसलमानांचा संयुक्त स्वागताचा समारंभ मोठा अपूर्व असा होता असे म्हणावयास मुळीच हरकत नाही.

आपल्या स्वागताला उत्तर देताना मौ. शौकत अली यांनी, डॉ. आंबेडकर हे माझे धाकटे भाऊ आहेत आणि हिंदी स्वराज्यात प्रत्येक धर्माच्या, जातीच्या व पंथाच्या व्यक्तीने आपण एकमेकाचे भाऊ-भाऊ आहोत अशी जिवाभावाची जाणीव करून घेतल्याशिवाय आपणास खरे स्वराज्य मिळणार नाही. मनुष्याला आपल्या कार्यात हिम्मत अगोदर पाहिजे आणि त्या दृष्टिने पाहाता डॉ. आंबेडकरांनी राऊंड टेबल परिषदेमध्ये दाखविलेली अस्पृश्य समाजाविषयीची हिम्मत खरोखर कौतुकास्पद आहे. मुसलमान समाज आपल्या हिंमतीने हिंदवी स्वराज्याला मदत करीत आहे व यासाठी सर्वानी एकमेकांशी सहकार्य हे केलेच पाहिजे, असे उद्गार काढले.

मौ. शौकत अलींच्या भाषणानंतर डॉ. आंबेडकर बोलावयास उठले. तेव्हा त्यांच्या जयघोषाच्या व स्वागतपर टाळ्यांच्या गजराचा सारखा वर्षाव होत होता. तसेच त्यांच्या गळ्यात सारखे पुष्पहार पडत होते. कित्येक वेळा पुष्पहारांमध्ये डॉक्टर आंबेडकर साहेब दडपून गेलेले दिसत होते. काही वेळाने हा गगनभेदी जयघोष एकदाचा थांबला व डॉ. आंबेडकरांनी बोलावयास सुरवात केली. प्रथमतः त्यांनी आपल्या स्वागताबद्दल सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार मानले आणि ते म्हणाले

आज हा येथील जमाव एका दृष्टिने अदभूत असा आहे. आजपर्यंत हिंदूंच्या

व मुसलमानांच्या स्वागताच्या अशा सभा बहुधा निरनिराळ्या होत असत. आणि यामुळे निरनिराळ्या समाजातील एकप्रकारची भिन्नता दृष्टोत्पत्तीस येण्याचा संभव येत असे. आज येथे आपण एक प्रकारच्या हिंदी ह्या भावनेने जमलो आहोत. राऊंड टेबल परिषदेसंबंधी येथे काही बोलावयाचे नाही. तरी पण मुसलमान प्रतिनिधींनी मला राऊंड टेबल परिषदेमध्ये अगदी आपलेपणाच्या भावनेने मदत केलेली आहे. त्यांची मदत न मिळती तर मला कित्येक वेळा सगळ्या प्रतिनिधींशी झगडणे अशक्य झाले असते. राऊंड टेबल मधील इतर