२९-११-१९३२ स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा दीप कधीही विझता कामा नये - Page 323

स्वाभिमानाचा . . . . . . विझता कामा नये २८१

(104) Crawn Cigartte 605 D. C. Labour Mandal

(105) Nana Chawk Mahar Sangh

(106) Ali India Untouchability League Poona

(107) Maharashtra Seva Sangh Poona

(108) Dakshin Maharashtra, Satya Prasarak Mandal Kolhapur

(109) Matang Dnyanodaya Samaj Bombay

(110) Asprishyonnati Mandal Nasik Road

(111) Temple Entry Satyagraha Mandal Nasik

(112) Bahishkrit Hitchintak Seva Sangh Nasik Road

(113) Shri Shahu Chhatrapati Boarding Nasik

(114) Asprishya Taroon Samata Samaj Chirabazar’” °

मानपत्राला उत्तर देताना डॉ. आंबेडकर म्हणाले,

आज मला जे मानपत्र दिले आहे, त्यातील गौरवाला मी कितपत पात्र आहे,

याबद्दल मला शंका वाटते. एखाद्या शेजाऱ्याला किंवा जवळच्या माणसाला त्याचे जितके दोष दिसतात तितके ते दूरच्या मंडळीस दिसणे अशक्य असते. मी राऊंड टेबल परिषदेमध्ये जी कामगिरी केली किंवा त्या कामगिरीचे यश माझ्या पदरी बाळगण्याचा प्रयत्न या मानपत्रात गौरवयुक्त शब्दांनी केलेला आहे. परंतु माझी मनोदेवता मला सांगते की, राऊंड टेबल परिषदेच्या कामगिरीच्या यशाचा मी धनी नव्हे. त्या यशाचे सर्वस्वी धनी इथे जमलेले माझे असंख्य बंधुभगिनीच आहेत. : आपण सर्वांनी ही एक गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवली पाहिजे की, कोणत्याही समाजाचा किंवा पक्षाचा पुढारी कोणत्याही यशाचा सर्वस्वी धनी कधीच होऊ शकत नाही. नुसते पुढारीपण असून चालत नसते. तर ज्या कार्याकरिता आपण पुढे झालो आहोत ते आपले माणुसकीच्या हक्काचे पवित्र कार्य खडतर स्वार्थत्यागाने व शिस्तीच्या मार्गाने केले पाहिजे. राऊंड टेबल ` परिषदेच्या कार्यासाठी मी तुमच्या वतीने प्रतिनिधी नेमला गेलो खरा, परंतु तुम्हीच ' ` तुमच्या कार्याची कळकळ जाणून माझ्या प्रयत्नांना एकमताने व एकजुटीने पाठिंबा दिला नसता तर मला काहीच करता आले नसते. राऊंड टेबल परिषदेच्या निमित्ताने का होईना अखिल हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गात जागृतीचा वणवा पेटला गेला आहे आणि ही जागृतीची ज्योत उज्ज्वल स्वरूपात अशी ब्रिटिश लोकांमा- तेथील राजकारणधुरंघर व्यक्तींना दिसली नसती, तर मला राऊंड टेबल परिषदेमध्ये काहीच करता आले नसते. तुमच्या अंत:करणात स्वाभिमानाचा

व स्वातंत्र्याचा जो दीप तेवत आहे तो अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न

करावयास पाहिजे. तो पुन्हा कधीही विझला जाता कामा नये, याची तुम्ही प्रत्येकाने प्रथम खबरदारी घेतली पाहिजे.

१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित मानपत्र : संपादक शंकरराव हातोले. पृ. २९-३३.