८-५-१९३२ अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे हवीतच - Page 341

अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे हवीतच २९९

ठराव १२ वा.--ही काँग्रेस नाशिक सत्याग्रहीचे अभिनंदन करते.

ठराव ११ व १२ हे अध्यक्षांनी अध्यक्षपदावरून मांडले व ते सर्वानुमते पास झाले.

काँग्रेसपुढील ठरावावर श्री. मलिक, रामसहाय, नंदागवळी व साखरे ह्यांची अतिशय परिणामकारक भाषणे झाली. सर्व ठराव पास झाल्यावर डॉ. आंबेडकरांनी निदान दोन शब्द तरी बोलावेत म्हणून लोकांचा आग्रह सुरू झाला. लोकांच्या या आग्रहास्तव डॉ. आंबेडकर जवळ जवळ १-३० वाजता बोलावयास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे येणे फारच आवश्यक आहे. याकरिता सर्व लोकांनी संघटित होऊन आपला राजकीय दर्जा संपादन केला पाहिजे. जोपर्यंत ह्या देशाच्या राजकीय नियंत्रणावर अस्पृश्य लोकांचा ताबा चालू शकत नाही तोपर्यंत त्यांची अस्पृश्यता जाणार नाही. नंतर रा. बं. श्रीनिवासन ह्यांनीही दोन

शब्द सांगितले.

शेवटी काँग्रसचे पुढील अधिवेशन बंगाल प्रांतात भरविण्याचे आमंत्रण श्री. मलिक ह्यांनी दिले. अध्यक्षांचे समारोपाचे लहानसे भाषण झाले व स्वागत कमिटीच्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल आभार मानण्यात आल्यावर बरोबर २-३० वाजता काँग्रेसचे अधिवेशन ' डॉ. आंबेडकर की जय ' ह्या घोषात संपले.

७ ७ ®