२९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मांडणार-दुलोरलाल (म. प्रांत)
अनुमोदन-सुभेदार घाटगे (मुंबई)
पुष्टी-पाटील (सं. प्रांत)
ठराव सर्वानुमते पास,
ठराव ८ वा.--डॉ. आंबेडकर व रा. ब. श्रीनिवासन यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जी कामगिरी केली तिच्याबद्दल ही काँग्रेस त्यास धन्यवाद देते व त्यांच्यावर अस्पृश्य वर्गाचा पूर्ण विश्वास आहे, असे जाहीर करते.
ठराव अध्यक्षांनी अध्यक्षपदावरुन मांडला व तो सर्वानुमते पास झाला.
ठराव ९ वा.--पंजाबच्या कायदेकौन्सिलात अस्पृश्य वर्गाचा एकही प्रतिनिधी देण्यात आलेला नाही, याबद्दल ही काँग्रेस आपली दिलगिरी व्यक्त करते व येत्या वेळी त्यांचा प्रतिनिधी घेण्याची तजवीज करावी, अशी सरकारास आग्रहाची विनंती करते.
मांडणार-हंसराज (पंजाब)
अनुमोदन-कानन (मद्रास)
पुष्टी-गुसावीलाल (म. प्रांत)
ठराव सर्वानुमते पास.
ठराव १० वा.--मूलभूत हक्कांचा तक्ता जो तयार करण्यात येत आहे, त्यात खालील मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात यावा--
(अ) स्थानिक स्वराज संस्थातून अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र मतदार संघामार्फत त्यांचे प्रतिनिधी घेणे.
(ब) मध्यवर्ती सरकारने अस्पृश्यात उच्चप्रतिच्या शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता काही रक्कम निदान काही मुदतीपर्यंत खर्च करण्याची जबाबदारी घेणे.
मांडणार-शामलाल (म. प्रात)
अनुमोदन-वनमाळी (मुंबई)
पुष्टी-बारसे (सं. प्रांत)
पुष्टी-मेढे (मुंबई)
ठराव सर्वानुमते पास.
ठराव ११ वा.--'' ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन ' या नावाची सर्व अस्पृश्य वर्गाची मध्यवर्ती संस्था स्थापन करण्यास ह्या काँग्रेसची पूर्ण संमती आहे व या मध्यवर्ती संस्थेचे काम चालविण्याकरिता नेमलेल्या तात्पुरत्या कमिटीस आपली संमती देते.