८-५-१९३२ अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे हवीतच - Page 343

५३
देवदर्शनाशिवाय कोणी मरत नाही

मु. निपाणी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर .यांना मानपत्र व थैली अर्पण करण्याच्या समारंभाची तयारी होती. त्याप्रित्यर्थ ता. २३ मे १९३२ रोजी तीन वाजण्याचे सुमारास कोल्हापूराहन निपाणीस जात असता क. कागल, ज. कागल येथील अस्पृश्य समाजाने महार- वाड्यातील तक्क्याचे इमारतीत त्यांना पान सुपारीचा समारंभ अगोदर ठरविला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोटारीतून साडे तीन वाजण्याचे सुमारास येत असता त्यांचे स्वामतार्थ कागल जहागिरीतील अस्पृश्य समाज चार पाच हजारावर जमला होता. सदर समाज गाव सोडून तीन चार फलाँग अंतरावर उभा राहिला होता. डॉ. साहेबांची मोटार येताच अस्पृश्य समाजाने मोठमोठ्याने

जयजयकार करीत व बँडचे वाद्य वाजवित लाठीवाले स्वयंसेवक मोटारचे मागचे

बाजूने जयजयकार करीत होते व मोटारीचे सभोवार हाताची साखळी करून बंदोबस्ताने जयघोषात चालले होते. या खेरीज प्रेक्षक मंडळी सुमारे चार पाच हजारावर जमली होती. अशा बंदोबस्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक चालली होती. मिरवणूक समारंभाचे ठिकाणी येताच स्त्रिया व पुरुषांचा जयघोष मोठमोठ्याने होत होता. मोटारीतून उतरून सिंहासनावर विराजमान होताच मि. भीमराव संताजी कांबळे मास्तर यांनी वेळेच्या अभावामुळे गौरवपर दोन शब्दे सांगितल्यावर पुष्पहार अर्पण करण्यात आला.

ठरल्यानुसार तारीख २३ मे १९३२ रोजी कर्नाटकात बहिष्कृत वर्गातील निरनिराळ्या संस्थांच्या मार्फत डॉ. बी. आर. आंबेडकर यांना दि. ब. È, एम.ए., एलएल. बी. यांच्या अध्यक्षतेखाली मानपत्र समारंभ मोठ्या थाटाने पार पडला. या समारंभास बेळगाव, धारवाड, कोल्हापूर आणि सांगली इत्यादी जिल्ह्यातून सुमारे ७-८ हजार जनसमुदाय जमा झाला होता. बँडच्या सुस्वर नादात कोल्हापूर वेशीपासून सभामंडपापर्यंत मिरवणूक आल्यानंतर मानपत्राच्या कार्यास आरंभ झाला. उच्चासनावर मे. बागडे वकील पुणे, भाऊराव पाटील सातारा, दत्तोबा पोवार कोल्हापूर, गणेशाचार्य वकील कोल्हापूर, मलगौडा पाटील बेनाडीकर व इतर बरीच मंडळी विराजमान झाली होती.

आरंभी स्वागतपर पद्ये म्हटल्यावर मे. मारुतीराव राव यांनी अध्यक्षांची सूचना आणली व तिला रावसाहेब पापाणा, बेळगाव यांनी अनुमोदन दिल्यावर दि. ब. we यांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात

जनता : २५ जून १९३२.