१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 358

३१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

या निवेदनावर-* (१) हिज हायनेस द आगा खान (मुस्लिम)

(२) २) डॉ. आंबेडकर (दलित वर्ग)

(३) राव बहादूर पन्नियर सेल्वम (भारतीय खिश्चन)

(४) सर हेन्री गिडने (अँग्लो इंडियन)

(५) ५) सर हबर्ट GR (युरोपियन) यांनी सह्या करून आपली

सहमती दर्शविली होती.

` या व्यतिरिक्त अस्पृश्यांच्या विशेष प्रतिनिधीत्वासाठी एक स्वतंत्र निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:च्या आणि राव बहाहूर आर. श्रीनिवासन यांच्या सहीने समितीला सादर केले होते.” २

अस्पृश्यांच्या मागण्यांबाबत म. गांधींची भूमिका स्पष्ट करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर खास जनतेकरिता लंडनहून पाठविलेल्या तारीख १३ नोव्हेंबर १९३१ च्या पत्रात म्हणतात

माझ्याविरूद्ध हिंदुस्थानातील ' राष्ट्रीय ' पत्रांनी जी शिव्यागाळीची व गैरसमज पसरविण्याची मोहिम चालविली आहे त्यासंबंधीचे बरेच निवडक व वेचक नमुने मजकडे आले असून त्यापैकी थोडे मी वाचूनही पाहिले. सत्याचे पक्षपाती व अहिंसेचे पुरस्कर्ते म्हणविणाऱ्या या लोकांचे सत्यप्रेम सचोटीचे व नेकीचे आहे असा खोटा विश्वास मी कधीच बाळगला नव्हता व त्यामुळे त्यांचे हे विपर्यस्त व खऱर्‍्या-खोट्याची छाननी न करता लिहिलेले लिखाण वाचून मला आश्चर्य वाटले नाही अगर माझी निराशाही झाली नाही `` ` `` `` - |

अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळू नयेत एवढ्या बाबतीतच गांधी हे विरूद्ध नसून अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधीही मिळू नयेत, असाही गांधीजींचा कटाक्ष आहे ! अस्पृश्य हे हिंदू आहेत व म्हणून त्यांच्याकरता राखीव जागांची वगैरेसुद्धा कायदेशीर. ( Constitutional) तरतूद करण्याची आवश्यकता नाही असा गांधींचा ठाम दुराग्रह आहे । माझी मुंडी गेली तरी बेहत्तर पण हिंदूंहून स्वतंत्र असे अस्पृश्यांना मी हक्कपूर्वक काहीही मिळू देणार नाही इतका गांधीजींनी आपल्या विरोधाचा पारा अस्पृश्यांच्या बाबतीत वर चढविला आहे । आणि अस्पृश्यांचा यात आत्मघात आहे. म्हणून मी विरोधं करतो, अशी उलट मखलाशी करून ते या आपल्या प्राणघातकी विरोधाचे जगासमोर समर्थन करीत आहेत, अशी खरी

१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटींग अँड स्पिचेस, खंड २, पृ. ६६६

२ तत्रैव : ६६९