माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . . . . मला पर्वा नाही ३१५
वस्तुस्थिती आहे आणि माझी खात्री आहे की, गांधीच्या विरोधाचे हे स्वरूप नीटपणे समजल्यावर आज जे काही दोन चार अस्पृश्य पुढारी माझ्याविरूद्ध असतील त्यांनाही आपला विरोध आवरून घ्यावा लागेल. गांधीजी आपल्या मनात वाटेल ते मांडे खुशाल खावोत, पण अस्पृश्यांचे हिताहित कशात आहे हे माझ्यासारख्या अस्पृश्याला त्यांच्यासारख्या स्पृश्यापेक्षा अधिक चांगले समजते हेच अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्यासारख्याच्या दुराग्रहाला माझे उत्तर आहे व ते देताना सर्व स्वाभिमानी अस्पृश्य जनतेचे हृद्गत मी बोलत आहे, असा माझा विश्वास आहे. “१
“ अल्पसंख्यांकांच्या WAR एकमत होत नाही, असे आढळताच ब्रिटिश मुख्य प्रधान मॅकडोनाल्ड यांनी अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांचा निर्णय करण्यासाठी मुख्य प्रधानास समितीच्या सदस्यांनी लवाद म्हणून एकमताने मान्य करून त्यांचा निवाडा मान्य करू अशा आशयाचे एक लेखी निवेदन सादर करावे अशी सूचना केली. मुख्य प्रधानांनी निर्णय द्यावा म्हणून जी लेखी मागणी केली त्यावर इतर सदस्यांप्रमाणे गांधीजींनीही स्वाक्षरी केली. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या मागण्यांच्या न्याय्यतेवर एवढा दृढविश्वास होता की त्यांनी या लेखी निवेदनावर सही केली नाही. “२
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याबाबत आपला खुलासा जाहीर केला.
“* बाबासाहेब आंबेडकरांचा जाहीर खुलासा
भाकित केल्याप्रमाणे खाजगी मायनॉरिटीज सब कमिटीचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि त्यामुळे अल्पसंख्यांकांचा प्रश्न हा या प्रश्नाशी जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या पक्षाकडून सोडविला जाणे अशक्यप्राय आहे असे प्रत्येकाला वाटू लागले आहे. अपयश येण्याला काय कारण झाले असेल याचा शोध लावण्यात पुष्कळजण दंग झाले आहेत. गेल्या गुरुवारी कमिटीच्या जाहीर बैठकीत केलेल्या भाषणात तडजोड व्हावयाला आपल्या मते कोणती गोष्ट आड आली हे गांधीजींनी स्पष्ट सांगितले. अल्पसंख्यांक वर्गाच्या प्रतिनिधींनी व खुद्द मुख्य प्रधानांनी गांधींच्या विचारसरणीस परिणामकारक उत्तर दिले. गांधीजींनी दिलेले कारण खेरीज करून इतर बऱ्याच गोष्टी तडजोडीला विघातक ठरल्या यात शंका नाही. पण सर्वात विघातक अशी कोणती गोष्ट झाली असेल तर ती म्हणजे स्वतः गांधीजींची काही विशिष्ट जातिविषयी कलुषित बुद्धी-आणि जातीजातीत भेदाभेद करण्याची प्रवृत्ती हीच होय. विशेषतः स्वतःच्या अध्यक्षतेखाली भरणाऱ्या खाजगी कमिटीमध्ये गांधींनी दलित वर्गाविषयी जे धोरण दाखविले त्याकडे जनतेचे लक्ष्य वेधून घ्यावेसे आम्हाला वाटते.
१ जनता : ५ डिसेंबर, १९३१.
२ Dr, Ambedkar : Life and Mission : Dhananjay Keer, Reprinted 1981 p. p. 190.