माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी ... ... . मला पर्वा नाही ३२१
परंतु, स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केल्याने ज्या अपमानाच्या मरणप्राय दु:स्थितीत आज ते आहेत ती सुधारत नाही व त्याचप्रमाणे हिंदू समाजाने त्यांच्या बाबतीत केलेल्या अपकाराची निष्कृतीही होत नाही असे मला वाटते; म्हणून अत्यंत नम्रतापूर्वक मला ब्रिटिश सरकारला कळवायचे आहे की, जर ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांकरिता स्वतंत्र मतदार संघ निर्माण केले तर मी प्राण जाईपर्यंत अन्नत्याग करीन |!
मी तुरुंगात कैदी असताना अशा तऱ्हेची गोष्ट करू लागलो तर सरकारला एका मोठ्या घोटाळ्यात पाडून त्यांच्या कारभारात अडचण उपस्थित करणे [होय ] याची मला जाणीव आहे व त्याबद्दल मला दु:खही होते. शिवाय मी अन्नत्याग करू लागलो तर राजकारणाच्या क्षेत्रात जे मला उच्च स्थान आहे ते लक्षात घेता मी असल्या अन्नत्यागाच्या गोष्टी करणे म्हणजे ही एक माझी वेडी लहर आहे इतके तरी कित्येकांना वाटल्याशिवाय राहणार नाही व असे करणे हे अत्यंत अनुचित आहे असेही ते म्हणतील. मी अन्नत्याग करण्याचे जे ठरविले आहे ही एक काम करण्याची माझी पद्धत आहे, एवढेच तुम्हाला माझ्यातफे म्हणता येईल. मी मोठा समंजस मनुष्य आहे, अशी जी काही माझी ख्याती असेल ती मी गमावून बसलो तरी हरकत नाही. पण मला माझ्या सदूसद्विवेकबुद्धीची आज्ञा मोडता येत नाही. आता जी माझी दृष्टी आहे त्या दृष्टीने पहाता मला तुरुंगातून सोडले तरी माझ्या अन्नत्यागाची शपथ मोडता येणार नाही. मला अशी आशा आहे की, अस्पृश्य वर्गाकरिता स्वतंत्र मतदार संघ निर्माण करण्याचा सरकारचा काही निश्चय आहे असे नसल्यामुळे तसे संघ करण्यात येणार नाहीत व मला वाटणारी भीती पौकळ ठरेल i
तुमच्याशी हा जो पत्रव्यवहार मी चालू केला आहे त्याबाबतीत माझ्यापुरता तरी मी अत्यंत गुप्तपणा ठेवला आहे, हे मी सांगणे नकोच. सरदार वल्लभभाई व श्री. महादेव देसाई हे मजबरोबर राहाण्याकरिता नुकतेच आले आहेत. . त्यांना मात्र या पत्रव्यवहाराची माहिती आहे. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे व त्या वेळीच ह्या पत्रांचा मी उपयोग करीन.
आपला
(सही) एम. के. गांधी [“१ ]
त
म त
१ डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ५, पृ. १७-२०.