माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . ... . मला पर्वा नाही ३२३
'' जातिविषयक प्रश्नाचा निर्णय
बुधवार दिनांक १७ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटिश सरकारतर्फे मुख्य प्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातिविषयक प्रश्नांचा निर्णय (Communal Award) हिंदुस्थानात व इंग्लंडात एकाच वेळी जाहीर केला होता. ह्या निर्णयामध्ये प्रांतिक कायदे कौन्सिलमध्ये प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश किती प्रमाणात होईल व संरक्षणाची कोणाकोणाला आवश्यकता आहे यांचे निवेदन केलेले होते. अल्पसंख्यांकांच्या कराराप्रमाणे (१) मुसलमान (२) शीख (३) इंडियन खिश्चन (४) अँग्लो इंडियन आणि (५) युरोपियन यांना "स्वतंत्र मतदार We’ देण्यात आला होता. स्त्रियांनाही जादा स्वतंत्र मतदार संघ देण्यात आला होता. अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदार संघ ठेवला होता. त्याशिवाय सर्वसाधारण सामान्य मतदार संघातफे जादा मत देण्याचा अधिकार ठेवला होता.
निर्णयाची कलमे
(१) गेल्या डिसेंबरच्या पहिल्या तारखेला दुसऱ्या राऊंड टेबल परिषदेच्या शेवटी मुख्य प्रधानांनी स्पष्टपणे जाहीर केले होते की, जातिविषयक प्रश्नांवर सर्व पक्षांना मान्य होईल अशा प्रकारची तोड जर हिंदुस्थानातील सर्व जातींनी काढली नाही तर, साम्राज्य सरकारने असा निश्चय केला आहे की, हिंदुस्थानच्या राज्यघटनेच्या प्रगतीला जातिविषयक प्रश्नाचा अडथळा न येऊ देता एक तात्पुरती योजना काढून सरकार अडथळा दूर करील. ह्या मुख्य प्रधानाच्या घोषणेला ताबडतोब पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांनी पाठिबा दिला होता.
(२) गेल्या दि. १९ मार्चला जेव्हा जातीचे एकमत न झाल्यामुळे नव्या राज्य घटनेच्या प्रगतीला अडथळा होत असल्याचे साम्राज्य सरकारला कळविण्यात आले तेव्हा सरकारने आपण या कठीण व वादग्रस्त प्रश्नांचा फेरविचार करीत असल्याचे निदर्शनास आणले. आता सरकारला असे स्पष्ट समजून आले आहे की, नव्या राज्यघटनेतील अल्पसंख्यांकांच्या दर्जाबद्दलचे काही प्रश्न तरी निदान सोडविल्याशिवाय घटना तयार करण्याच्या कार्यात पुढील प्रगती होणे शक्य नाही.
. (३) म्हणून साम्राज्य सरकारने पुढे दिलेल्या योजनेतील सूचनांचा, पार्लेमेंटपुढे हिंदी राज्यघटनेबाबत ठेवण्यात येणाऱ्या योजनेमध्ये समावेश करावयाचा असे ` ठरविले आहे. या योजनेची मर्यादा फक्त प्रांतिक कायदेमंडळात ब्रिटिश हिंदुस्थानातील जातीचे प्रतिनिधी घेण्यासंबंधीच्या प्रश्नापुरती मर्यादित करण्यात आली आहे. मध्यवर्ती कायदे मंडळातील प्रतिनिधी-संबंधीचा विचार का पुढे