भोळसट कल्पनांमुळे . . . . . . कष्टमय झाला आहे ३७७
एखादा वकील तिकडे पाठवावयास पाहिजे, अधिक चौकशी करादयास पाहिजे, पण पैशाच्या अभावी हे घडणे दुरापास्त आहे. या कामाकरिता फंड जमवून योग्य तजवीज केल्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र सरकारी अंमलदारांस याबाबतीत असे स्पष्ट बजावल्याशिवाय राहवत नाही की, अशी परिस्थिती चालू राहिल्यास त्याचा परिणाम चांगला होणार नाही.
` अशाप्रकारे त्यांचे भाषण झाल्यावर अध्यक्षांनी मे. मणियार साहेब सभेस आले होते त्यांना दोन शब्द बोलण्यास विनंती केली. मे. मणियार साहेबांनी पुण्याच्या तहनाम्यासंबंधी आपला आनंद व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगिरीची अत्यंत प्रशंसा केली. नंतर अध्यक्षांचे आभार मानण्यात आले व सभा बरखास्त झाली. |
| eee