२१-३-१९२० जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे. - Page 43

जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन `

ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे

““ दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाच्या परिषदेची पहिली बैठक मुक्काम माणगाव, संस्थान कागल येथे ता. २१/२२ मार्च सन १९२० रोजी भरली होती. पहिला दिवस पाडव्याचा होता तरी पणं सभेस जवळजवळ पाच हजारावर समुदाय जमला होता. याहीपेक्षा जास्त समुदाय जमला असता परंतु आजुबाजूच्या कित्येक खेड्यापाड्यातील बहिष्कृत लोकांची कुळकर्णी, तंलाठी वगैरे लोकांनी अशी समजूत करून दिली की, ही सभा बाट्या लोकांची असून अध्यक्ष देखील बाटलेलेच आहेत. यास्तव अशा सभेस जाणे अप्रशस्त आहे. असे सांगून बऱ्याच लोकांची मने या सभेबद्दल कलुषित केली होती. सभेस कोल्हापूर दरबारातील वरिष्ठ दर्जाची व बहिष्कृतांची हितेच्छू मंडळी हजर होती. काही थोडे ब्राह्मण गृहस्थही हजर होते; परंतु डिप्रेस्ड क्लास मिशन व इतर बहिष्कृतांच्या हितासाठी झटणाऱ्या कोणत्याही [संस्थेचे ] एक [पिसू ] देखील आले नव्हते हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.

दिवस पहिला.

परिषदेच्या कामास ता. २१ रोजी पाच वाजता सुरूवात झाली. प्रथमतः स्वागतकमिटीचे अध्यक्ष श्री. दादासाहेब राजेसाहेब इनामदार यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी प्रतिनिधींनी अशा लहानशा खेडेगावात, सण, वार, घरगुती अडचणी इत्यादी काही न पाहता सभेस येण्याची तसदी घेतली याबद्दल त्यांचे आभार मानिले. आजच्या परिस्थितीचे वर्णन करून ही परिषद का बोलावण्यात आली, याचे दिग्दर्शन केले. हल्लीच्या स्वराज्याच्या काळात इतर लोक आपले बरे करतील असे समजून त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या स्वजनोद्धाराचे महत्कार्य आपण स्वत:च केले पाहिजे असे सांगून त्यांनी आपले भाषण संपविले. नंतर रितीप्रमाणे सूचना व अनुमोदन मिळाल्यावर परिषदेचे नियोजित अध्यक्ष श्री. भीमराव आंबेडकर हे टाळ्यांच्या कडकडाटात स्थानापन्न

झाले.