(90
जातीभेद नष्ट केल्याशिवाय
उन्नतीचा मार्ग असंभव
कोकण पंचमहाल (राजापूर ते गोवाहदइ) महार समाज सेवा संघ,मुंबई यांचे विद्यमाने रविवार ता. १६ एप्रिल १९३३ रोजी रात्रौ माझगाव बोगद्याची वाडी, सिमेंट चाळ येथे एक मोठा सहभोजन समारंभ अतिशय उत्साहाने पार पडला. सदर सहभोजन प्रसंगी अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच मे. सुभेदार सवादकर, नामदेव बुवा येरलेकर, डोळस, दुधवडे, रामभाऊ सोनवणे, उपशाम, बनसोडे, रा. ग. भातनकर, सु. अ. ल. शिरावले, शि. गो. हाटे, गो. ग. वरघरकर व मे. कवळी बी. ए., एलएल. बी. इत्यादी मंडळी हजर होती.
प्रथम रा. शि. ना. बालावलकर यांनी आजच्या सहभोजनाचा उद्देश सांगताना सांगितले की, महार समाजात बेले महार, पान महार अशा प्रकारचे जे भेद आमच्या कोकणात आहेत ते नाहीसे झाले पाहिजेत. याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन शब्द सांगण्यास त्यांनी विनंती केली. श्री. नामदेव बुवा येरलेकर म्हणाले की, अगदी पूर्वी काही आपसातील भांडणामुळे हे भेद पडले असावेत. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत. तेव्हा हे भेद मोडणे अत्यंत जरूर आहे. या म्हणण्यास रा. ग. धु. जाधव, क. का. पोइपकर, ल. सो. अस्वेकर यांनी अनुमोदन दिले.
नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड गजरात बोलावयास उभे राहिले, ते म्हणाले,
प्रिय बंधु भगिनींनो,
आज मला अतिशय महत्त्वाची कामे होती. दोन-चार दिवसांनीच मी विलायतेस जाणार असल्यामुळे माझ्यामागे अतिशय निकडीची कामे आहेत. परंतु आजच्या समारंभाला माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्व असल्यामुळे मी मुद्दाम या सहभोजनाला आलो आहे. जातीभेद काढून टाकल्याशिवाय आपल्या उन्नतीचा मार्ग मोकळा होणार नाही. महार समाज हा मुसलमान समाजाप्रमाणे जातीभद न मानणारा समाज आहे. ही महार समाजाबद्दल अतिशय चांगली गोष्ट आहे. कोणत्याही प्रांतातील महार एकत्र जेवू शकतात. मी [मुंबई ] [इलाख्यात ] सर्वत्र फिरलो आहे. त्यावेळेस महारात भेद नसल्याचे [मला ] [दिसून ] [आले ] [आहे. ] फक्त कोकणात काही ठिकाणी महारात [बेले ] व [पान ] [असे ] [भेद ] [आहेत. ] [ते ] [तेथे ]
जनता : २२ एप्रिल १९३३.