४१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हिंदू समाज आपला पुढील कार्यक्रम आखील तरच अस्पृश्य समाजाला हिंदू समाजाशी सहकार्य करून कार्य करण्याची उमेद प्राप्त होईल.
डॉ. आंबेडकर यांच्या भाषणानंतर डॉ. मुंजे यांचे भाषण झाले. त्यांनी डाँक्टरसाहेबांच्या भाषणाची संधी साधून डॉक्टरांना हिंदू महासभेचे अध्यक्ष होण्याची विनंती केली, परंतु डॉक्टर असल्या आमिषाला निष्कारण बळी पडणारे नाहीत ही गोष्ट डॉ. मुंजे यांनी पक्की लक्षात ठेवावी. म. गांधींशी सुध्दा कोणताही करार करताना डॉक्टरसाहेबांनी स्वतःच्या लौकिकाला व मानापमानाला महत्त्व दिलेले नाही. आपल्या समाजाच्या सर्वांगीण हिताला जे पोषक होईल तेच कार्य डॉक्टरसाहेब आजपर्यंत करीत आले आहेत, ही एकच गोष्ट हिंदू महासभावाल्यांनी लक्षात ठेवावी.
७ ७ ७