गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ?
शनिवार तारीख २९ सप्टेंबर १९३४ रोजी रात्रौ, मुंबईतील परळ पोयबावडी वरील कामगार मैदानावर पुणे कराराची स्मृती जागृत ठेवण्याकरता एक प्रचंड जाहीर सभा भरली होती. अस्पृश्य गणलेल्या समाजातील दहा हजारावर लोक या सभेत हजर होते. त्यावेळी अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मननीय व समाजात नवचैतन्य उत्पन्न करणारे असे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
जवळ जवळ गेली दोन हजार वर्षे अस्पृश्य समाज हा देशातील समाजाचा अभिन्न असा एक घटक म्हणून कधीच समजला गेला नाही. एखादे राजकीय अगर सामाजिक कार्य उपस्थित झाल्यास त्या कार्यासंबंधी विचार करण्याची संधी अस्पृश्य समाजास कधीच मिळाली नव्हती. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे
लक्ष दिल्यास ब्राह्मण, कायस्थ, मराठे इत्यादी जातींकडे या गोष्टींचा विचार करण्याचा जणू मक्ताच दिला होता असे :दिसते.
या कार्यात महाराची कामगिरी वर्दी देण्यापलिकडे म्हणजे जासूदगिरी- पेक्षा अधिक वरच्या दर्जाची कधीच नव्हती. इतर जातींना आमंत्रणे पोचती केल्यावर फार तर त्यांनी दरवाज्याबाहेर बसून अंतर्गहात चाललेल्या गोष्टींचा कानोसा घ्यावा. आत काय विचार चालू आहे त्याची गंधवार्ताही
त्यास नव्हती.
. अस्पृश्य समाज जिवंत प्राण्यांचा बनलेला असून त्यांना इतर मानवजातीप्रमाणेच गरजा आहेत. मनुष्यमात्राला ज्याप्रमाणे सुखदुःखाच्या भावना आहेत त्याचप्रमाणे या समाजालाही भावना आहेत, ही कल्पनाही स्पृश्य समाजास कधी शिवली नाही व त्यामुळे अस्पृश्य समाजास देशातील सामाजिक काय किंवा राजकीय काय, कोणत्याच प्रकारच्या उलाढालीत वाव मिळाला नाही.. पृथ्वीवरील कोणत्याच देशात न आढळणारी अशी विपरीत पध्दती हिंदुस्थानदेशात' मात्र कित्येक शतके दृढमूल झाली होती: या कालात समाजशास्त्यांनी, राज्यकर्त्यांनी किंवा तत्त्वज्ञान्यांनी या. समाजघातकी विचारसरणीस आंळा घालून विचारास नवीन वळण लावण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. याचा अनिष्ट परिणाम अस्पृश्य जनतेवर होऊन त्यांचे जीवन rr tt reer OL
जनता : २० आँक्टोबर १९३४.