३-५-१९३६ राजकीय सत्तेचा वापर न्याय्य व उदार बुद्धीने करावा लागेल - Page 514

८५
राजकीय सत्तेचा वापर

न्याय्य व उदार बुद्धीने करावा लागेल

या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर-वर्हाडकडे दौऱ्यावर गेले होते. रविवारी ता. ३ मे १९३६ रोजी दुपारी नागपूर स्टेशनवर त्यांच्या स्वागताकरता हजारो अस्पृश्यांचा जमाव जमला होता. मि. एस. समिउल्लाखान आणि रावसाहेब आर. डब्ल्यू. फुले हे नागपूर म्युनिसीपालिटीतफें स्वागतार्थ स्टेशनवर आले होते. बिडी कामगार युनियनचे लोकही आले होते. संध्याकाळी टाऊन हॉलमध्ये त्यांना नागपूर म्युनिसीपालिटीतफें मानपत्र अर्पण करण्यात आले. मानपत्राचा आशय पुढीलप्रमाणे होता--

सार्वजनिक कार्याच्या निरनिराळ्या क्षेत्रात आपण काम केले आहे. अस्पृश्य वर्गाच्या उद्धारार्थ आपण राजकीय व सामाजिक कार्यात अत्यंत उत्साहाने व धेयानि अविश्रांत श्रम घेतले आहेत. नाशिक व महाड येथे सत्याग्रह करून हिंदू समाजाला त्यांच्या चिरकालीन निद्रेतून आपणच जागृत केलेत. अस्पृश्य वर्गाच्या _ स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करून त्यांना समाजातील त्यांच्या न्याय्य हक्काची जाणीव करून दिलीत. दलित वर्गाच्या हक्कासाठी आणि समाजात योग्य दर्जा मिळविण्यासाठी चळवळ करण्याचे सर्व श्रेय आपणासच आहे. याबाबतीत ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन ही आपल्या परिश्रमाची स्पष्ट साक्ष होय.

राजकीय बाबतीतही आपण उच्च wie पटकाविले आहे. सायमन कमिशनबरोबर सहकार्य करण्यासाठी मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलने नेमलेल्या कमिटीचे सभासद या नात्याने आपण लिहिलेल्या भिन्न मतपत्रिकेवरून आपली कुशाग्रबुद्धी दृष्टोत्पत्तीस येते. इतकेच नव्हेतर आपल्या देशाच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याविषयीची चिताही स्पष्ट दिसून येते. गोलमेज परिषदेमध्ये दलित वर्गातफं आपण केलेले जोरदार समर्थन आणि ' पुणे करारा ' च्या बाबतीतील आपले कार्य या दोन गोष्टी इतक्या जगजाहीर आहेत की त्यांचा उल्लेख करण्याचीही आवश्यकता नाही. l

मानपत्राला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

म्युनिसीपालिटीकडून मानपत्र घेण्याचा माझ्या सार्वजनिक आयुष्यात हा दुसरा प्रसंग आहे. मला पुष्कळशा म्युनिसीपालिट्यांनी मानपत्रे देण्याची इच्छा

जनता : २३ मे, १९३६.