३-५-१९३६ राजकीय सत्तेचा वापर न्याय्य व उदार बुद्धीने करावा लागेल - Page 515

राजकीय सत्तेचा वापर . . . . . बुद्धीने करावा लागेल ४७१

दर्शविली. परंतु मानपत्रे न घेण्याचे माझे धोरण आहे. मी असा कृतघ्न का ? असे कोणाला वाटेल, पण यात कृतघ्नपणाचा भाग नाही. राष्ट्रीय वृत्तपत्रे व संस्था यांच्या दृष्टीने मी मोठा मनुष्य नाही. लोकांनी माझा गौरव केला किंवा न केला तरी माझे काम पवित्र आहे, असे मला नेहमी वाटत आले आहे. अशाप्रकारची जी मानपत्रे देण्यात येतात त्यात सुधारणेच्या बडेजावाखाली आपण जी खोटी विधाने नेहमी करतो, कनव्हेन्शानल लाइज ऑफ सिव्हिलायझेशन त्याचाच बराचसा भाग असतो. मानपत्र न घेण्याच्या माझ्या धोरणाला मी पहिला अपवाद वसई म्युनिसीपालिटीच्या बाबतीत केला. कारण काही मित्रांच्या मुर्वतीसाठी मला ते स्वीकारावे लागले. नागपूर म्यु. च्या बाबतीत मी दुसरा अपवाद केला, याबद्दल मला दुःख होत नाही. म्युनिसीपालिटीच्या सभासदांनी मानपत्राचा खर्च स्वतः देण्याचे कबूल केले आहे. त्यावरून या मानपत्रात कळकळीचा भाग आहे, असे मी समजतो.

आजच्या प्रसंगाचा राजकीय व्यासपीठ म्हणून उपयोग करण्याबद्दल आपण मला क्षमा करा, मजविषयी लोकात निरनिराळे गैरसमज पसरविले जात आहेत. मजवर जितकी टीका केली जाते, तितकी इतरांवर क्वचितच केली जात असेल. मजवर टीका करणाऱ्यांचा मुख्य रोख असा आहे फी, अल्पसंख्यांकांचा म्हणून जो करार प्रसिद्ध आहे त्याबाबतचा मुख्य गुन्हेगार मी आहे, अशी त्यांची समजूत आहे. वर्तुळ परिषदेत जे धोरण मी ठेवले होते, त्याबद्दल मला यत्किंचितही खेद वाटत नाही. वर्तुळ परिषदेत मी जे कामकाज केले ते वाचण्याची आपण जर तकलीफ घेतली, तर निरनिराळे प्रश्‍न सोडविण्याबाबत ज्या सूचना मी केल्या, त्या पुष्कळशा राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या सूचनांपेक्षा श्रेष्ठ दर्जाच्या होत्या, हे आपल्या लक्षात येईल. खुद्द म. गांधी माझ्या म्हणण्यात सत्यता आहे,

याचा पुरावा देतील,

अल्पसंख्यांकांनी वर्तुळ परिषदेत जे धोरण ठेवले होते, ते न्याय्य होते. इतकेच नव्हे तर. उदारपणाचे होते, असे मी म्हणतो. आयर्लंडमध्ये अल्स्टरवाल्यांनी होमरूलच्या चळवळीत काय उत्तर दिले, ते मी आपल्या नजरेस आणू इच्छितो. अत्स्टरमध्ये अल्पसंख्यांक प्रॉटेस्टंट होते व दक्षिण आयर्लंडमध्ये बहुसंख्य रोमन कॅथोलिक होते. दक्षिण आयलंडचे प्रतिनिधी श्री. रेडमंड यांनी अल्स्टरवाल्यांना ' तुम्ही मागाल त्या सवलती देतो, पण इंग्लंडला मिळू नका, होमरूलला पाठिंबा द्या ' असे सांगितले. ' तेव्हा जळो तुमचे होमरूल ; आम्ही कॅथोलिकांच्या राज्यात राहाणार नाही ' असे कार्सनने सांगितले, वर्तुळ परिषदेत हिंदुस्थानच्या अल्पसंख्यांकांनी ' रक्षणबंधने मिळोत किंवा न मिळोत