sie डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे
दाखविली तशीच ती कायम ठेवली पाहिजे. म्हणजे हिंदू धर्मातून अलग व्हावयाचे जे आपले ध्येय ते आपण गाठू शकू.
नुकतेच स्पृश्य हिंदुंनी जोधपूर व गुजरात येथील अस्पृश्यांवर अनन्वित अत्याचार केले आहेत ही अत्याचारांची गुलामगिरी नष्ट करावयाची असल्यास धर्मांतर केल्याशिवाय आपल्याला इलाज नाही, हिंदुंना इंग्रज डोमिनि4 स्टेटस देत असताही जर इंग्रजांच्या राज्यात राहावयाचे नाही, तर आम्ही तरी हिंदुंच्या राज्यात का राहावें? एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही. त्याला सूर्याचा स्वतंत्र प्रकाश मिळाल्याशिवाय ते वाढीला लागणार नाही ; हिंदू धर्माच्या या जीर्ण वृक्षाखाली आमची वाढ होणार नाही, म्हणून आम्ही धर्मांतर करणारच,
सदर सभेतही मुसलमानांचा बराच भरणा दिसत होता व काही मुसलमान सभेच्या बाजूस नमाज पडत होते. त्याचप्रमाणे अस्पृश्य पुढाऱ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या मोटारी लागल्या त्या परधर्मीयांनी, खिस्ती पाद्र्यांनी व मुसलमान पुढाऱ्यांनी मोठ्या. आनंदाने दिल्या, असे कळते. या सभेला एकही प्रमुख हिंदू पुढारी किंवा धर्मातरविरोधी अस्पृश्य कार्यकर्ता हजर नव्हता.