१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
संस्थेने सरकारला लिहून पाठविलेले स्टेटमेन्ट वाचून दाखविले. त्याचा परिणाम इतका झाला की, श्री. गवई व त्यांचे मदतगार लोक जागच्या जागीच थिजले ! नंतर पुढील ठराव परिषदेत सर्वानुमते पास करण्यात आला. तो ठराव असा :-
ठराव ३ रा :- बहिष्कृत वर्गाचे सुधारलेल्या कौन्सिलात जे प्रतिनिधी घ्यावयाचे ते सरकारी नेमणुकीने किंवा त्यांच्यातील जातवार संघातर्फे न घेता बहिष्कृतेतरातर्फ कौन्सिलात निवडून गेलेल्या प्रतिनिधीमार्फत नेमण्यात यावे अशी जी सूचना खास बहिष्कृत वर्गाच्या उन्नतीप्रित्यर्थ स्थापन झालेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनने केली होती त्यामुळे सर्व अस्पृश्य वर्गाचे मन अस्वस्थ झाले आहे, कारण बहिष्कृतेतर वर्गाच्या प्रतिनिधींना बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधी नियोजित करण्याचा जर अधिकार दिला तर ज्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेमुळे बहिष्कृत वर्गाचे नष्टचर्य ओढवले आहे, ती चातुर्वर्ण्य व्यवस्था कायम करण्यास आमच्यातील जे लोक कबूल होतील अशाच लोकांना प्रतिनिधी नेमण्यात येईल, त्याअर्थी या परिषदेचे असे ठाम मत आहे की, डिप्रेस्ड क्लास मिशनने ( भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीने ) आपल्या आश्रितांचा असा उघडपणे द्रोह केल्यामुळे ती बहिष्कृत वर्गाच्या विश्वासास अपात्र झाली आहे.
या ठरावावर पी. एन. भटकर, द्रविड, कदम वकील यांची भाषणे झाल्यावर गवई त्यास पुष्टी देताना म्हणाले की, “ तुम्हाला (जहाल मवाळांना ) जर नॉमिनेशन नको आहे तर आम्हालाच काय म्हणून ते असावे ? सरकारने आमचे प्रतिनिधी नेमावे असे जरी मिशनने मागितले असते तरी बरे झाले असते. परंतु जहाल मवाळांनी आमचे प्रतिनिधी नेमावेत अशी मागणी करणे म्हणजे आमचा द्रोह करणे नव्हे काय ? मिशनने जी आमच्या प्रतिनिधींची मागणी आम्हाला न विचारता केलेली आहे ती अगदी घातक आहे. त्यामुळे डिप्रेस्ड क्लास मिशनवरील आमचा विश्वास अजिबात उडालेला आहे.'' १
नागपूरचे म्हणजेच या प्रांतातील जनतेचे सुदैवच म्हणावे लागेल की, १९२० ची भारतीय बहिष्कृत परिषद बोलावण्याचा पहिला सन्मान येथील अस्पृश्य कार्यकर्त्यांना मिळाला. ही परिषद का बोलवावी लागली याची वर दर्शविलेली पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या परिषदेला अस्पृश्यांच्या राजकीय जीवनात
आगे कदम ' करण्याच्या दृष्टीने अपूर्व स्थान प्राप्त झाले होते यात शंका नाही. ७०००
* "जनता खास अंक १९३३ व जनता अंक १३-४-१९४० : सी. ना. शिवतरकर यांचा लेख-डॉ. आंबेडकरांच्या सहवासातील काही संस्मरणीय प्रसंग.