उन्नतीच्या आड Acre निषेध ९
गुलामगिरी लादू पहात आहेत. ही परिस्थिती ओळखून डॉ. आंबेडकरानी डिप्रेस्ड क्लास मिशनच्यामार्फत शिंद्यांनी दिलेली कैफियत अस्पृश्यांच्या arn बाधक आहे असे जाहीर करण्याचे ठरविले. अस्पृश्यांच्या राजकीय आकांक्षा काय आहेत याचा जाहीर खुलासा एखाद्या वजनदार गृहस्थाच्या नेतृत्त्वाखाली व्हावा म्हणून अस्पृश्यांची एक परिषद छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे १९२० ची भारतीय बहिष्कृत परिषद नागपूरला घेण्यात आली.
डिप्रेस्ड क्लास मिशन विरोधी ठराव
परिषदेत डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेच्या व तिच्या चालकांच्या निषेधाचा ठराव येणार आहे अशी कुणकुण अण्णासाहेब शिंदे यांना आगाऊच लागली होती. म्हणून त्यांनी श्री. ग. आ. गवई याजकडे मुद्दाम मनुष्य पाठवून कळविले होते की, मी तुमच्या वऱ्हाड प्रांतातील yo मुले माझ्या बोडींगमध्ये घेतो, पण तुम्ही डॉ. आंबेडकर व शिवतरकर जो आमच्या संस्थेच्या निषेधाचा ठराव आणणार आहेत तो हाणून पाडा. त्याबरहुकूम श्री. गवई व बेळगावचे श्री. पापण्णा यांनी आपल्या बाजूने कडेकोट तयारी केली होती. आम्ही नागपूरास जाताना डी. सी. मिशनच्या चालकांनी अस्पृश्यांच्या हिताविरूद्द जे स्टेटमेन्ट सरकारकडे पाठविले होते त्याचा उतारा टाईम्स पत्राच्या अंकात आला होता. त्याची एक कॉपी तो अंक दोन वर्षापूर्वीचा असल्याकारणाने दोन रुपये खर्चून आम्ही विकत घेतला होता. परिषदेचे पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर रात्री विषयनियामक कमिटीची बैठक बसली. त्यात काही ठराव पास झाल्यावर डॉ. आंबेडकर अध्यक्षांच्या परवानगीने म्हणाले,
“ आपण येथे जमलेले सर्व प्रतिनिधी बहिष्कृत वर्गाची उन्नती कशी होईल या दृष्टीने विचार करण्याच्या हेतूने जमलो आहोत. म्हणून आपल्या लोकांच्या उन्नतीच्या आड येणारी व्यक्ती मग ती बहिष्कृत वर्गातील असो किंवा उच्चवर्णीय हिंदूतील असो, तसेच एखादी संस्था असो पण ती आपल्या हिताच्याविरूद्ध एखाद कृत्य करीत असेल किंवा तसे कृत्य तिने मागे केले असेल तर त्या गोष्टीचा आपण निषेध करावा किंवा नाही ? “ तेव्हा सगळे प्रतिनिधी एक आवाजाने म्हणाले की, अलबत, आमच्या प्रगतीच्या आड येणारी कोणतीही व्यक्ती असो किवा संस्था असो तिचा आपण तीव्र निषेध केलाच पाहिजे “ ही गोष्ट तुम्हा सर्वांना मान्य आहे काय ? “ असे डॉ. आंबेडकरांनी तीन-तीनदा बजावून विचारले. त्यांनी नंतर शिवतरकर यांचेजवळून टाईम्स पत्राचा अंक घेवून त्यात डिप्रेस्ड क्लास मिशन