८-११-१९३६ ज्या वक्षाच्या छायेखाली गुण्यागोविदाने बसावयाचे आहे त्या छायेच्या फांद्या तोडण्याचा दुष्टपणा करू नका. - Page 607

ज्या वृक्षाच्या छायेखांली....... दुष्टपणा करू नका ५६३

बळी पडून जे आज अविचाराचे आणि दुष्टपणाचे कृत्य करावयास प्रवृत्त झाले आहेत त्यांच्यापदरी यश कितपत मिळेल याबद्दल शंका आहे, परंतु ते आज आपलीच कु-हाड आपल्याच पायावर मारून घेत आहेत. या सर्वप्रकारच्या कारवायापासून अलिप्त राहून मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने जो कार्यक्रम तुमच्यापुढे ठेवीत आहे तो तुम्ही, समता सैनिक दलातील प्रत्येक सैनिकानी शिस्तीने पार पाडला पाहिजे.

आपल्याला बऱ्याच बलाढ्य शत्रूंशी टक्कर द्यावयाची आहे. यासाठी कमीत कमी दोन हजार समता सैनिकांची उभारणी या मुंबई शहरात झाली पाहिजे. आपल्याजवळ मुबलक गनुष्यबळ असल्यावर, शिस्तीच्या व संघटनेच्या बळावर वाटेल त्या बिकट परिस्थितीत मार्ग काढणे कधीही कठीण झाले नाही. माझ्या निवडणुकीबाबत कॉँग्रेस व इतर हितशत्रू पुष्कळ प्रकारची कारस्थाने रचून, माझा त्यांच्या मार्गातील काटा काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझी खात्री आहे की, माझ्या निवडणुकीच्या वार्डातील प्रत्येक अस्पृश्य मतदार मला मत दिल्याशिवाय राहणार नाही आणि हे कार्य समता सैनिक दलाने प्रत्यक्ष हाती घेऊनच करावयास पाहिजे आणि माझी खात्री आहे की, माझ्या गैरहजेरीत ही मोठी जबाबदारी समता सैनिक दलाचा प्रत्येक शिस्तीचा शिपाई इमानेइतबारे पार पाडील. मी या कार्यासाठी एक कमिटी नेमली आहे. तिच्या मदतीने तुम्हास तुमचे कर्तव्यकर्म पार पाडता येईल.