८-११-१९३६ ज्या वक्षाच्या छायेखाली गुण्यागोविदाने बसावयाचे आहे त्या छायेच्या फांद्या तोडण्याचा दुष्टपणा करू नका. - Page 606

५६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

लोकांना प्राप्तीच्या वाट्याच्या वेळी हात पसरला असता त्यांना काहीतरी देण्यात आम्हीतरी का उदारपणा दाखवावा ! .वटवाघुळाच्या वृत्तीने ज्यांना आपले जिणे जगावयाचे आहे त्यांच्या आरोपाची आणि कांगावखोरपणाची पर्वा मला वाटत नाही. इतकेच नव्हे तर पुणे कराराच्या पूर्वी गांधीजींनी प्राण पणास लाविला .तेव्हा ह्या लोकांना गांधीजींना वाचविण्यासाठी कायदे कौन्सिलात मुळीच जागा नको होत्या. मग आता माझ्या. प्रयत्नामुळे मिळालेल्या ह्या जागा हे का मागतात ? खरे पाहिले तर या राष्ट्रीय हरिजन पक्षातले प्रमुख पुढारी म्हणविणारे श्री. नारायणराव काजरोळकर वेळ पडल्यास डॉ. सावरकरांच्या ओटीत बसतील, श्री. पी. बाळू देशभक्त वल्लभभाईंच्या ओटीत धडपडत असताना दिसतील. अशा परिस्थितीत य़ा पक्षाची शेवटी काय अवस्था होईल हे आजच सांगून उपयोगी नाही. अशा या खऱ्या परिस्थितीवर कधी कोणी प्रकाश पाडला आहे काय ? आमच्या पक्षाशी ज्याने आजपर्यंत सहकार्य केले व आमच्या कार्याच्या यशासाठी जे झटले ते श्री. शिवतरकर मास्तर हे चांभार समाजातले एक प्रमुख आहेत. त्यांना दुर्दैवाने म्युनिसीप्रल कमिटीकडून कायदे मंडळांच्या निवडणुकीसाठी उभे राहाण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना आमच्या पक्षातर्फे उमेदवार म्हणून उभे करता आले नाही. असो

खरे पाहिले असता मला या कायदे मंडळात जाण्यापेक्षा कायदे मंडळाच्या बाहेर राहूनच कार्य करण्यात अधिक बरे, असे वाटते. माझ्यापुढे आज धर्मांतराचा प्रश्‍न आहे. नवीन कॉलेजची काळजी आहे व इतर बरीच सार्वजनिक कामे आहेत. तरीसुद्धा आपणा सर्वांच्या इच्छेसाठी मी या नवीन पक्षाच्या संगनमताने कायदे मंडळात शिरण्याचा संकल्प केला आहे. माझी पूर्ण खात्री आहे की, माझ्य़ा या संकंल्पात काँग्रेस काटे पेरल्याशिवाय राहणार नाही. पैशाच्या बळावर काँग्रेस मला विरोध करण्याचे अनेक प्रकारंचे प्रयत्न करील व आज त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न चालविले आहेत. यासाठी आपण सर्वांनी शिस्तीने संघटित झाले पाहिजे आणिं आपली प्रत्येकाची सर्व मते यावेळी मला मिळाली पाहिजेत. मी निवडून येण्यासाठी तत्त्वापासून ढळणार नाही, ही गोष्ट तुम्हीं लक्षात ठेविली पाहिजे. आपणास कुणी मदत करणार नाही आणि अशावेळी फंदफितुरीच्या मोहाला तुम्ही बळी पडता कामा नये. ज्यांना उमेदवार म्हणून घेता आले नाही असे असंतुष्ट लोक फंदफितुरीच्या मार्गाला लागलेले : आहेत. त्यांच्या फंदफितुरीला केवळ स्वाभिमानासाठी तरी बळी पडू नका. तुम्ही विचार करा की, ज्या वृक्षाच्या छायेखाली आपणास गुण्यागोविंदाने बसावयाचे आहे, ज्या वृक्षाच्या छायेने आपणास पूर्ण समाधान.मिळणार आहे ती छाया तुम्ही . नष्ट करण्याचा, ह्या छायेच्या फांद्या कुऱ्हाडीने तोडून टाकण्याचा. दुष्टपणा करणार नाही अशी मला खात्री आहे. स्वार्थाला, लोकांच्या चिथावणीला