१९-३-१९२७ जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - Page 92

५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

व्यवस्था केली. स्थानिक पोलिसांचा उत्साह आरोपी लोकास कायद्याने ठरविलेले प्रायश्चित भोगावयास लावण्याच्या कामी अगदी कमी दिसला. हे पाहून नामदार गव्हर्नर साहेब व जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याकडे झालेल्या हकिकतीचा संदेश तारेने पाठविण्यात आला व पोलिसास या बाबतीत योग्य ताकीद देण्यात यावी असे सुचविण्यात आले होते. या मारामारीच्या आगीचा वणवा महाड शहराच्या बाहेरही पसरला होता असे दिसून आले. शहरातील मारामारी थंडावल्यानंतर वरिष्ठ वर्गातील काही दुष्ट AHA आजुबाजूच्या काही खेड्यातील मराठे लोकास निरोप पाठविला की तुमच्या गावावरुन महार लोक जेव्हा परततील तेव्हा त्यास ठोक द्या. त्याचप्रमाणे या दुष्ट लोकांनी लांबलांबच्या खेडेगावापर्यत महाडचे तळे अस्पृश्यांनी बाटविले. तुमच्या विहिरी तरी सांभाळा.'' अशाप्रकारचे चिथविणारे लेखी संदेश पाठविले. याचा परिणाम असा झाला की, ही आग सर्वत्र पसरली व दरेक गावात अस्पृश्य लोक इतर समाजाच्या दृष्टीने अल्पसंख्यांक असल्याने सर्वच ठिकाणी त्यांना मार खावा लागला. काही ठिकाणी तर त्यांना जबर दुखापतीही झाल्या.

या लोकांचा बचाव व्हावा म्हणून ज्या गावामधून अशा प्रकारचे अत्याचार झाले व ज्या ज्या लोकांनी केले अशांची एक यादी तयार करून कुलाबा जिल्ह्याचे पोलीस सुपरिन्टेन्डेंट याच्याकडे पाठविण्यात आली. इतके झाल्यानंतर मंगळवारी सकाळी मुंबईतील लोक अधिक रजा.. नसल्याकारणाने परत आले. डॉ. आंबेडकर व चित्रे हे मागे राहिले. त्यांनी डिस्ट्रिक्ट सुपरिन्टेन्डेंटची पुन्हा गाठ घेऊन झालेली सर्व हकिकत कळविली व पोलीसांनी अस्पृश्य लोकांचा तरणोपाय होण्यास काय काय केले पाहिजे हे समजावून सांगितले. मंगळवारी संध्याकाळी महाड शहरातील ब्राह्मणेतर पुढारी यांची एक खाजगी बैठक बोलाविण्यात आली. झालेल्या महाड येथील दंग्यात ब्राह्मणेतरांनी विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून आल्यावरून, त्यांच्या पुढाऱ्यांकरवी अशा दुष्ट कृत्यास आळा घालण्याची काही तरी उपाययोजना व्हावी या हेतूने ही खाजगी बैठक बोलावण्यात आली होती. परंतु खेदाची गोष्ट आहे की, एक दोन माणसे खेरीज करून अशा प्रकारच्या वर्तनास आळे घालण्याचे कामी सर्वांनीच अंग झटकले. एवढा खटाटोप करून चित्रे व आंबेडकर बुधवारी मुंबईस परत आले. ही परिषद कोणत्याही दृष्टीने पाहता महत्त्वाची झाली यात संशय नाही. तिचे परिणाम बरे की वाईट हे कालांतरानेच ठरेल. परंतु ती परिणामकारक झाली असे म्हणावयास हरकत नाही.

परिषद यशस्वी करण्याचे कामी तसेच मारामारी होऊन जखमी झालेल्या लोकांस मदत करण्याचे कामी महाड येथील चांद्रसेनीय कायस्थ जातीतील तरुण ` पिढीने जी अंगमेहनत केली त्याबद्दल कुलाबा जिल्ह्यातील अस्पृश्य वर्ग त्यांचा सदैव ऋणी राहील.'” *

eco

बहिष्कृत भारत : 3 एप्रिल १९२७.