१९-३-१९२७ जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - Page 91

जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका ४९

बऱ्याच लोकास जखमा झाल्या. इतका अतिप्रसंग होईतोपर्यंत महाडचे मामलेदार यांनी गर्दी कमी करण्याचा काहीच उपाय अंमलात आणिल्याचे दिसले नाही. शेवटी ४-१५ च्या दरम्यान मामलेदार साहेब पोलीस सबइन्स्पेक्टरसह डाक बंगल्यावर आले व डॉ. आंबेडकरांना म्हणू लागले की, आपण शांतता राखण्यास आमच्या बरोबर चला. तुमच्या लोकास तुम्ही समजवा व आमच्या लोकास मी समजावतो. खरे म्हटले असता त्यावेळी अस्पृश्य लोकास समजावण्याचे काही कारणच नव्हते. कारण जमलेल्या अस्पृश्य लोकांच्या अफाट जनसमूहानी शांतता कधीच मोडली नव्हती. शिवाय बरेचसे अस्पृश्य लोक शहराबाहेर निघूनही गेले होते. तरी पण मामलेदार साहेबांच्या सांगण्याप्रमाणे डॉ. आंबेडकर व-त्यांच्याबरोबर बंगल्यावर उतरलेली इतर मंडळी शहराकडे जाण्यास निघाली. वाटेत विरेशवराच्या देवळाजवळ वरिष्ठ वर्गाच्या जमलेल्या लोकांनी त्यास अडविले व त्यांच्यातफे डिंगणकर व तुळजारामशेटचा | भाऊ चुनिलाल हे देवळाच्या बाबतीत खुलासा करा वगैरे प्रश्‍न विचारू लागले. त्यास डॉ. आंबेडकरांनी फौजदारास जे उत्तर दिले तशाच प्रकारचे उत्तर दिले. परंतु लोक शांत होतील अशी वर्तणूक ठेवण्याऐवजी लोकांची मने WET होतील अशारीतीचा वाद करण्यास त्यांनी सुरुवात केली. म्युनिसीपालिदीचा ठराव तो काही लोकांचा ठराव नाही, तुम्ही तळ्यावर गेलात ते आम्हाला अगोदर सूचना देऊन का गेला नाहीत वगैरे वगैरे प्रश्‍नाचा मारा करू लागले. तोंडास _ तोंड देण्यात अर्थ नाही हे जाणून डॉ. आंबेडकरांनी व त्यांच्याबरोबरच्या मंडळीनी पुढे जाण्यास सुरुवात केली. वाटेत अस्पृश्य लोक देवळात शिरले रे शिरले अशी ओरड करीत काही लोक धावपळ करू लागले. मॅजिर्ट्रेटसाहेब यांनी हे प्रत्यक्ष पाहिले असताना त्यांना कैद करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. उलट हंशावरी ती गोष्ट घालवून दिली! शेवटी ज्या अस्पृश्य लोकांची समजूत घालण्याकरिता डॉ. आंबेडकरांना नेण्यात आले होते त्यापैकी एकही अस्पृश्य तेथे नव्हता हे पाहून डॉ. आंबेडकर व त्यांच्याबरोबरची मंडळी बंगल्यावर परत आली. तो तेथे अदमासे १०० अस्पृश्य लोक जमून बसले होते. त्यात काही जखमी झालेले लोक होते. हा प्रकार दृष्टीस पडेतोपर्यंत दंगलीचा शेवट रक्तपातात झाला याची कोणास कल्पनाही नव्हती! ही कल्पना झाल्यानंतर अस्पृश्यातील पुढारी लोकास, एका गोष्टीचा मोठा अचंबा वाटला. तो हा की, दंग्याच्या दिवशी मॅजिस्ट्रेट शहरात हजर असताना दंग्यास वेळीच आळा का घालता आला नाही. परंतु तो विचार करण्याचा प्रसंग नव्हता. सर्व गोष्टी बाजूस ठेवून आधी जखमी झालेल्या लोकास हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली व तेथून त्यांना घेऊन पोलीस चौकीवर त्यांच्या फिर्यादी गुजरण्यात आल्या. पुरावा गोळा करण्याचे काम अत्यंत बिकट असे होते. वरिष्ठ वर्गाचे लोक एक कटाने वागत असल्यामुळे खरे सांगण्यास कोणी पुढे येईना. अस्पृश्य वर्गातील लोक भीतीने गांगरुन गेल्यामुळे नावे सांगण्यास धजेनात. अशा परिस्थितीत मुंबईहून गेलेल्या पुढारी लोकांनी दोन दिवस राहून शक्य तेवढा पुरावा गोळा करण्याची