२७-३-१९३८ श्रीमंताच्या पैशावर पक्षाचे कार्य जर चालू लागले तर पक्षाचे वैशिष्ट्य नष्ट होईल - Page 170

आणि भाषणे डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन १५२

सर्व स्त्रिया स्वतंत्र मजूर मला समजले की, स्त्रियांच्या अलिकडील गटातील

स्त्रियांचा सभासद न झालेल्या पक्षाच्या सभासद आहेत व पलिकडील गट

गट मोठा स्त्रियांचा आहे. या दोन्ही गटात सभासद न झालेल्या स्त्रियांचाच दिसतो. ज्या स्त्रियांना व पुरुषांना येथे सभेला येऊन काय कार्य चाललेले आहे हे ऐकावेसे वाटते त्यांना आठ आणे देऊन सभासद होण्याची बुद्धी का झाली नाही, याचे मला आश्चर्य वाटते. हा स्वतंत्र मजूर पक्षाचा एकदर कारभार कोणाकरिता व कशासाठी आहे, याचा तुम्ही विचार केला आहे काय ? हासर्व कारभार तुमच्या आमच्यावर जो इतरांचा जुलूम चालू आहे तो नाहिसा करण्यार्कारेता आहे. तेव्हा या कारभाराला मदत करणे, हे तुमचे कर्तव्य नाही काय? या जमलेल्या स्त्रियांमध्ये पुष्कळांना पानसुपारी खाण्याची सवय: असेल. त्यासाठी दरमहा त्यांचे रुपया दोन रुपये खर्च होत असतील ! असे असता स्वतंत्र मजूर पक्षालाच वर्षाकाठी आठ आणे देण्यास त्यांना जड का वाटावे ? माझी सर्व महार स्त्रियांवरच भिस्त आहे. त्या पुढे येऊन स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभासद होतील तर पुरुषांनाही त्यांचा कित्ता गिरविणे भाग पडेल. आतापर्यंत तुम्ही सर्व स्वतंत्र मजूर पक्षाचे आठ आणे देऊन सभासद झाला नाहीत याबद्दल मला खेद वाटतो. परंतु मला आशा आहे की, थोड्याच अवधीत तुम्ही सर्वजण स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हाल.

पुरुषांनाही * जा हेच सांगावयाचे आहे की, तुमच्या हितासाठी स्वतंत्र मजूर पक्ष निघाला असून त्याचे आतापर्यंत चार हजारच सभासद व्हावेत ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. तुम्ही सर्वांनी या पक्षाचे सभासद का होऊ नये, हे मला कळत

नाही. काँग्रेसच्या-श्रीमंतांच्या कैवारी संस्थेच्याविरुद्ध गोरगरिबांची दाद लावण्याचे कार्य हा स्वतंत्र मजूर पक्ष करीत आहे. आज असेंब्लीत कॉँग्रेसच्या झिंज्या उपटणारा व गरिबांचा कैवार घेणारा कोणता पक्ष असेल तर तो एकटा

स्वतंत्र मजूर पक्ष हाच होय ! मला या पक्षासाठी कॉग्रेससारखे श्रीमंतांकडून पैसे मिळणार नाहीत, असे नाही. मी प्रयत्न केला तर श्रीमंतांकडूनही या

पक्षाला पुष्कळ पेसे मिळवून देवू शकेन. परंतु अशारीतीने श्रीमंतांच्या पैशावर

जर या पक्षाचे कार्य चालू लागले तर मग या पक्षाचे वैशिष्ट्य नष्ट होईल. हा.

पक्ष श्रीमंत लोकांनी विकत घेतल्यासारखे होईल. मग या पक्षाला गरिबांच्या.

हिंतासाठी कसे झटता येइल ? म्हणून गरिबांच्या हितासाठी निघालेल्या या स्वतंत्र मजूर पक्षाला गरिबांनीच मदत केली पाहिजे. असे करण्यानेच तुमचे. स्वातंत्र्य कायम राहील. गरिबांचा संसार गरिबांनीच चालविला पाहिजे हे जर तुम्हाला समजले असेल तर मला आशा आहे की, मुंबई शाखेच्या स्वतंत्र मजूर

पक्षाच्या सभासदांची संख्या चार हजारांची चाळीस हजार होण्यास वेळ लागणार नाही. देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसचे शेठजी-भटजी मिळवणार नसून ते स्वतंत्र

मजूर पक्षाचा श्रमजिवी वर्गच मिळवील ही गोष्ट लक्षात देवा.