१२२
श्रीमंत पावर तांच्या पेशावर पक्षाचे कार्य जर चालू लागले
तर
पक्षाचे वैशिष्ट्य नष्ट होईल
दि. २७ मार्च १९३८ रोजी नायगाव मुंबई येथे स्वतंत्र मजूर पक्षाची
वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आजच्या या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मुंबई शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस
हैजर राहण्यास मला आनंद वाटतो. आपले स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्य शिस्तीने
ब नियमबद्धतेने चालू ठेवण्याकडे लक्ष देणे जरूर आहे. आजची सभा महत्त्वाची
आहे. आज सकाळी मी स्वतंत्र मजूर पक्षाच्या मुंबई शाखेच्या ऑफिसला भेट
दिली व दोन-अडीच तास तेथे राहून चाललेल्या कामाची तपासणी केली. त्यात
तेथे जे पाहण्यास मिळाले ते पाहून मला आनंद व आश्चर्यही वाटले. आश्चर्य
बाटण्याचे कारण हे की, स्वतंत्र मजूर पक्षाचे येथील कार्य अत्यंत व्यवस्थितपणाने
ब सुरळीत चालल्याचे मला दिसून आले आणि दुसरा कोणीही माणूस ऑफिसमध्ये
जाऊन पाहील तर त्याच्याही मनाची खात्री झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या
कोणाला ऑफिसमध्ये जाऊन सदर काम पाहणे शक्य नसेल त्यांची मी खात्री
करू शकतो की, एकंदर कामाची व्यवस्था चांगल्या तऱ्हेने चालली
आहे. ऑफिसमध्ये काम करणारे जे स्वयंसेवक किंवा थोडासा मोबदला घेऊन
काम करणारे ९-१० वर्कर्स आहेत त्यांनाही या कामाचे श्रेय दिले पाहिजे. आपला
पक्ष गरिबांचा असल्यामुळे आपणाला त्यांना भरपूर मोबदला देता येत नाही. असे
असून ते व्यवस्थित काम करतात. हे त्यास भूषणावह आहे. आता तुम्हाला
जो जमाखर्चाचा अहवाल वाचून दाखविण्यात आला त्यावरून तुम्हाला दिसून
आले असेल की, आतापर्यंत हजार बाराशे रुपयांचा खर्च झाला आहे व हजार बाराशे रुपये शिल्लक आहेत. या जमाखर्चाची काँग्रेसच्या जमाखर्चाशी तुलना केल्यास काँग्रेसच्या मिठमिरचीलाही ही आपली रक्कम पुरणार नाही एवढी थोडी आहे. आतापर्यंत कार्यकारी मंडळातील ४०-५० लोकांनी व बाहेरील २५-३० प्रचारकांनीच हे कार्य केले आहे. तुम्ही सवांनी जर मनावर घेतले तर यापेक्षाही मोठे कार्य घडून आल्याशिवाय राहाणार नाही, मुंबई शहरात अस्पृश्य बर्गाचीच लोकसंख्या एक लाखावर आहे. . त्यापैकी आतापर्यंत स्वतंत्र मजूर पक्षाचे चार हजार सभासद झाले आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येथे लोकांची बसण्याची जी व्यवस्था केली आहे, त्यावरून स्त्रियांचे दोन गट व त्याप्रमाणेच पुरुषांचेही दोन गट असलेले मला दिसून आले. चौकशी केल्यावर
जनता : २ एप्रिल १९३८.