१३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणें
लढ्याच्या चळवळीचा परिणाम आपल्या अस्पृश्य बांधवांवर किती झालेला आहे ते पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. आज येथील मंडळी माझ्या भाषणाशिवाय इतर कोणाही वक्त्याचे भाषण ऐकावयास तयार नाही. आज बदललेल्या परिस्थितीचे मूळ आणि मुख्य कारण म्हटले म्हणजे आपल्या समाजात सामाजिक, धार्मिक व आर्थिक उन्नतीच्या दिशेने झालेले यशस्वी प्रयत्नच आहेत.