४-४-१९३८ सर्वानी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय ही भूमिका घ्यावी - Page 173

१२५ |

सर्वांनी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय

ही भूमिका घ्यावी

सोमवार तारीख ४ व मंगळवार तारीख ५ एप्रिल १९३८ रोजी फक्त बिन- सरकारी बिलांचे कामकाज होणार होते. आज कर्नाटक विभक्तीकरणाचा ठराव असेंब्लीपुढे यावयाचा असल्यामुळे स्पीकरच्या गॅलरीत कर्नाटकाचे सुप्रसिद्ध पुढारी श्री. गंगाधरराव देशपांडे वगैरे मंडळी दिसत होती. प्रेक्षकांच्या गॅलरीतही कन्नड बांधवांचीच गर्दी दिसत होती. प्रथम प्रश्‍नोत्तरे झाल्यावर श्री. व्ही. एन. जोग यांनी आपला ठराव असेंब्लीपुढे मांडला.

श्री. व्ही. एन. जोग यांनी आणलेल्या मूळ ठरावात तात्तिवकदृष्ट्या फरक करून हा ठराव पुढीलप्रमाणे उपसूचनेसह असेंब्लीमध्ये सादर केला, "' प्रामुख्याने कानडी-भाषा बोलणारे सर्व विभाग एकत्र आणून त्यांचा एक स्वायत्त कर्नाटक प्रांत करण्याची शक्य तितकी लवकर व्यवस्था करावी, असे या असेंब्लीचे मत मुंबई सरकारने ब्रिटिश सरकारला कळविणे. " आपल्या भाषणात श्री. जोग यांनी कर्नाटकाच्या विभक्तीकरणाची बरीच महती सांगितल्यावर असेंब्लीमधील कानडी सभासद श्री. दोडुसेटी, नलवडी, जकाती यांची कानडी, करंदीकर, कॉ. झाबवाला, एस. पी. पाटील यांची भाषणे झाल्यावर स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधी भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात

सांगितले,

या ठरावाचा प्रश्‍न माझ्या दृष्टीने अत्यत गभीर स्वरूपाचा आहे. हा ठराव म्हणजे भावनावश होऊन करावयाचे कार्य नव्हे. कर्नाटकाच्या विभक्तीकरणाचा प्रश्‍न सहजगत्या सोडविण्यासारखा नाही. आम्हा अस्पृश्यवर्गीय बांधवांना, आम्ही निरनिराळया प्रांतांचे असलो तरी, हा गुजराती, हा महाराष्ट्रीय किंवा हा कङ्नडी असा भेदभाव मुळीच करत नाही. मी या प्रश्‍नाकडे भावनाविरहीत दृष्टीने पहात आहे. आपल्या मुंबई इलाख्याच्या संयुक्त कुटुंबात या तिन्ही प्रमुख प्रांतांतील लोक गेली ११५ वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहात आहेत. सिध प्रांत आपल्याबरोबर जवळ-जवळ ९० वर्षे होता. त्याचे विभक्तीकरण झालेले

जनता : ९ एप्रिल १९३८.