२०-४-१९३८ तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कार्यी लावा - Page 177

तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कार्यी लावा १३९

२७ आहे. माझ्या समजुतीप्रमाणे असेम्ब्लीमध्ये ज्या ११ जागा अधिकाराच्या

आहेत त्यापैकी ६ ब्राह्मणांनी पटकावल्या आहेत. त्यात पाटलाची किंमत आहे

काय ? १७५ सभासदात त्यांना कोणीही विचारीत नाही. खरे पाहिले असता

या देशातले राजकारण ब्राह्मण जातीशिवाय चालले पाहिजे. आज राजकारणात

भटजी, शेठजी, गुजर व सावकारांचे कडबोळे झालेले आहे. त्यात गरीब

शेतकरी वगैरे श्रमजिवी वर्गाला वाव नाही. आजच्या या परिस्थितीचा विचार

केल्यानंतर गांधीजींच्या पश्‍चात या राजकारणात गोंधळ माजल्याशिवाय राहणार

नाही. आज आपण जो राजकारणात धुडगूस घालीत आहोत त्याला गांधींच्या

पश्चात कोणी किंमत देईल काय ? याचा अजून कोणीही विचार केलेला

नाही. म्हणून आपल्या हितासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र चळवळ

करा. मी माझ्या पक्षात येऊन मिळा असेच म्हणत नाही. _ पण आपल्या न्याय्य

हक्कांचे संरक्षण होईल अशीच चळवळ करा. तुम्हा मराठे मंडळींना सांगायचे म्हणजे तुमच्या हितासाठी आमचे श्री. विचारे मास्तर यांनी एक शेतकरी पक्ष काढला आहे. त्याला तुम्ही मराठे मंडळींनी अवश्य मदत करावी. तसेच जेथे राखीव जागा नाहीत तेथील अस्पृश्य लोकांनी या नवीन शेतकरी पक्षातर्फे जे उमेदवार उभे आहेत त्यांना अवश्य मदत करावी. या लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविल त्याला तुम्ही भुलू नका. तुमची पवित्र मते विकू नका तर ती सत्कार्यी लावा.

डॉ. बाबासाहेबांच्या भाषणानंतर श्री. विचारे यांचे भाषण झाल्यावर पुष्पहार वगैरे अर्पणविधी झाला. नंतर डी. एस. पवार यांनी पाहुणे मंडळींना थाटाची मेजवानी दिली.