२०-४-१९३८ तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कार्यी लावा - Page 176

| १२६

तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कार्यी लावा

गेल्या आठवड्यात बुधवार, ता. २० एप्रिल १९३८ रोजी, मु. इस्लामपूर व ओंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रचंड अशा जाहीर सभा झाल्या. या दौऱ्यात डॉ. आंबेडकरसाहेबांबरोबर आमदार सावंत, ससाने मास्तर, मे. उबाळे हे होते. इस्लामपूरच्या सभेस सुरूवात करताच श्री. डी. एस. पवार यांच्या भाषणानंतर आ. सावंत, एम. एल. ए. यांचे प्रथम भाषण झाले. त्यात त्यांनी काँग्रेस व स्वतंत्र मजूर पक्ष यांच्या कामगिरीची तुलनात्मकदृष्ट्या कल्पना मोठ्या कुशलतेने मांडली. नंतर सत्यशोधक (ब्राह्मणेतर) पक्ष काँग्रेसने कसा नष्ट केला हे सांगून याबाबत सातारा जिल्ह्यातील मराठा समाजास त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तसेच येत्या जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षातर्फे वाळवे, तालुका इस्लामपूर गटातफ श्री. भाऊराव देवजी कांबळे हे उभे आहेत. तासगावतफे श्री. खंडनाक राजनाक इनामदार व खानापूरतफें श्री. धोंडी मालू साळवे हे उभे आहेत. त्यांना त्या त्या ठिकाणच्या मतदारांनी अवश्य निवडून द्यावे. त्यानंतर डॉ. आंबेडकरसाहेब टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात भाषण करावयास उभे राहिले.

ते आपल्या भाषणात म्हणाले,

या जिल्ह्यात पुढील महिन्याच्या २४ तारखेस जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकरता स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने जे उमेदवार उभे राहिले आहेत त्यांनाच आपण सर्व मतदारांनी मते देऊन निवडून आणा, असे सांगण्यासाठी मी उभा आहे. या सभेत मराठे व अस्पृश्य यांचा एकत्रित जमाव आहे. त्यामुळे मराठे मंडळींना मला जे निराळे सांगावयाचे आहे ते अशक्य दिसते. असो. या देशातील हिंदू समाजाची रचनाच अशी आहे की सर्व लोकांवर ब्राह्मण प्रभुत्व असणारच. कोणताही विधी ब्राह्मणाखेरीज होत नाही. तसेच इतर व्यवहारही त्यांच्याविना चालत नाही. हायकोर्टातील वरिष्ठ जागापासून तो खेडे गावातील तलाठ्यापर्यंत ब्राह्मणाशिवाय कुणीही दिसणार नाही. १९१९ पासून ते १९३८ पर्यंत कौन्सिलमध्ये अवघे चार पाच ब्राह्मण दिसत असत. पण आता या ब्राह्मण कौन्सिलरांची संख्या जवळ-जवळ

जनता : ३० एप्रिल, १९३८.