निवडून दिलेली माणसे . . . . यावर पाळत ठेवा १४५
कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये त्यांच्याविरुद्ध प्रचार करणे हे तुमचे कर्तव्य होय. जसे
निवडून देणे हे तुमचे कर्तव्य आहे तसेच त्यांच्या कार्यावर नजर ठेवणे हे तुमचे आद्यकर्तव्य होय. यांच्यावर अशारीतीने पाळत ठेवल्याने ते भीतीने
तरी कौन्सिलमध्ये कार्य करतील. अशारितीने तुमचे कार्य चालल्यास तुमच्या
हिताचे बरेच कार्य होईल. आज मला वेळ नसल्यामुळे माझे भाषण येथेच
संपविणे बरे होईल. असे म्हणून डॉक्टरसाहेबांनी आपले भाषण
| संपविले. यानंतर डॉक्टरसाहेबांचे व जमलेल्या मंडळीचे आभार मानल्यावर
डॉक्टरसाहेबांच्या जयघोषात समारंभ संपला.