११-५-१९३८ तर आपली स्वतंत्र युनियन स्थापावी - Page 185

१ 7१ तर आपली स्वतंत्र युनियन स्थापावी १४७

विरोधी पक्ष व डॉ. बाबासाहेबांचा पक्ष यांच्यातील एकमेकांच्या वैगुण्याविषयी

बरीच चर्चा झाल्यावर यावर रामबाण उपाय डाँक्टरसाहेबांनी खालील प्रमाणे

सुचविला.-

(१) स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद हजारोंनी करा व ह्या पक्षाचे एकोप्याने

बल वाढवा. |

(२) दलित फेडरेशनचे कार्य जातीय ऐक्यापुरते ठेवा. [Optional]

(३) समता सैनिक दलातर्फे सार्वजनिक विहिरी व स्थळे हस्तगत करा.

यानंतर पक्षाचे तुकडे पाडणारांचे बरेचसे समर्थनपर भाषण झाले. पण बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होऊन सर्वांनी याच पक्षाखाली नवीन प्रतिनिधी निवडून एकच पक्ष ठेवावा व स्वतंत्र मजूर पक्षाचेच कार्य जोराने चालवावे

व बाबासाहेबांच्या भाषणाने इतर विरोधी पक्ष दिपून गेले व आता लोकनियुक्त

कारभार चालल्यास आमची गती काय होईल हे त्यांनाच समजेनासे झाले. डॉक्टरसाहेबांच्या नावाचा उपयोग करून स्वतःला आंबेडकर पक्षीय म्हणविणाऱ्या इतर मंडळींना आमची सूचना आहे की, आतातरी बाबासाहेबांची ही आज्ञा शिरसावंद्य मानून स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे व आपापले प्रतिनिधी निवडून देऊन सर्व नागपूरात एकच एक डॉ. बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्ष कायम ठेवावा अशी श्री. आर. आर. पाटील यांनी अपेक्षा व्यक्‍त केली.