१३१
न्याय्य हक्कांसाठी तरुणांनी मरणही पत्करले पाहिजे
गेल्या ता. १० जानेवारी १९३८ रोजी मुंबई येथील असेंब्ली हॉलवर कोकणातील शेतकऱ्यांनी आपला ' मार्च ' करून आपल्या संघटनेचे जे बल दाखविले त्याची स्मृती अजून मुंबईकरांच्या स्मरणातून गेली नसेलच. स्वतंत्र मजूर पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शिस्तीने व संघशक्तीने आपला मोर्चा असेंब्लीवर नेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढारीपणाखाली एका शिष्ट- मंडळाच्या वतीने ना. खेरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत कोकणातील शेतकऱ्यांना खोतांपासून होणाऱ्या असह्य त्रासाची, जोरजुलुमांची हृदयस्पर्शी कैफियत शेतकऱयांच्या प्रतिनिधींनी ना. खेरांपुढे निवेदन केली होती. शाब्दिक आशवासनापलीकडे या मुलाखतीमध्ये विशेष काही घडले नव्हते. शेतकऱ्यांना काँग्रेस सरकारच्या हया आशवासनाविषयी बिलकूल विशवास वाटत नव्हता. या परिस्थितीतून आपला मार्ग कशा रितीने शोधून काढावा याचा विचार कोकणातील गांजलेला शेतकरी वर्ग व त्यांचे स्थानिक पुढारी करीत होतेच. तसेच स्वतंत्र मजूर पक्षाचे सन्माननीय पुढारी व श्रमजीवी वर्गासाठी धडाडीने कार्य करावयास पुढे सरसावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोकणात दौरा काढून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष परिस्थिती अवलोकन करणार ही बातमी कळताच येथील स्थानिक पुढाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याची रूपरेषा आखली आणि त्याप्रमाणे डॉ. आंबेडकरसाहेब आपले सहकारी मित्र मे. भाई चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, डी. व्ही. प्रधान वगैरे मंडळीसह या दौऱ्यासाठी गेल्या आठवड्यात कोकणात गेले.
कोकणातील लोकसंख्या जवळ जवळ १३ लाखांवर असून येथील कुणबी, महार, मराठेही ८ ते १० लाख शेतकरी जनता खोतीशाहीच्या जुलमी अंमलाखाली आपले आयुष्य कंठीत आहे. यासाठी या खोतांच्या जुलमी कारभारावर प्रकाश पाडण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाने आखलेल्या या दौऱ्यातील मुख्य व मोठ्या सभा खोतांच्याच बालेकिल्याच्या ठिकाणी घेण्यात आल्या.
कणकवलीची पहिली प्रचंड सभा
या विभागात लॉऊड स्पीकर वगैरेच्या सहाय्याने अशा मोठ्या प्रचंड समुदायाच्या सभा भरल्याचे कधीच ऐकिवात नाही. परंतु कोकणातील : महारादी अस्पृश्यांची पहिली प्रचंड सभा, ता. १४ मे १९३८ रोजी मु. कणकवली जनता : शनिवार २८ मे आणि ४ जून १९२३८. 0001