MR/Khand_18_2 - Page 22

शेटजी-भटजी संस्कृती नष्ट करणे हे आपल्या चळवळीचे उद्दिष्ट कसे आहे हे समजावून सांगितले आहे. १९४२ साली दलित वर्ग परिषद नागपूर येथे झाली. या परिषदेस मार्गदर्शन करताना लोकशाही जिवंत असणे किती आवश्यक आहे याचे विवेचन केले आहे.

तिसऱ्या भागात धम्मदीक्षेच्या वेळचे भाषण हे आंबेडकरी चळवळीचे सार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अस्पृश्यतेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी धर्मातर हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे. १९२० ते १९५६ हा प्रवास एका क्रांतीचा प्रवास म्हटला पाहिजे. 'मुक्ती कौन पथे' ची परिपूर्ती दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ ला झाली आहे. यावेळी त्यांनी केलेले भाषण हे जसे भारतीयांसाठी महत्त्वाचे आहे, तसेच जगभरातील मुक्ती इच्छुकांसाठीदेखील मार्गदर्शक आहे. परंपरेतून बाहेर पडताना इतिहासाची साक्ष देत स्वाभिमानाबरोबरच नीतीचा आधार देत अनुयायांना त्यांनी पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे आज दिसते आहे.

या सर्व भाषणांमध्ये व लेखनांमध्ये दोन सूत्रे मांडली गेली आहेत. एकतर इतिहासाची पुनर्मांडणी त्यांनी केली आहे. इतिहासाचे पुनर्लेखन व पुनर्लेखन मांडले आहे. भारतीय इतिहास हा नाग व आर्य यांचा संघर्ष आहे. दुसऱया शब्दात मांडायचा झाल्यास हा संघर्ष दोन विचारधारांतील आहे. बौद्ध धम्म व ब्राह्मण यांच्या संघर्षाचा हा इतिहास असल्याचे त्यांनी मांडले आहे. त्याचबरोबर जाती-वर्ण व्यवस्था नष्ट केल्याशिवाय नव्या मूल्यांवर आधारित नवसमाज निर्माण होणार नाही यासाठी समता, बंधुता, स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित समाज निर्माण केल्याशिवाय येथे मानवास मुक्तता मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. यासाठी भारतीयांनी नवसमाज निर्मितीच्या कामाला लागले पाहिजे, हा त्यांचा आग्रह कायम आहे. भारत बौद्धमय करण्याचे त्यांचे हे स्वप्न आपल्याला येथे दिसून येते.

बाबासाहेबांचे अखेरचे भाषण हे दिनक २५ नोव्हेंबर १९५६ रोजी महाबोधी सोसायटीने आयोजित केलेल्या स्वागत सगारंभाचे आहे. बुद्धांचे पहिले प्रवचन

(अठरा).