कार्य केल्याचे आपणास दिसून येते. याशिवाय काही भाषणे ही बौद्ध धम्माची
ओळख व महत्त्व सांगणारी अशा स्वरूपाची आहेत. धर्मातरापूर्वीची भाषणे ही
प्रस्थापित हिंदुधर्म सुधारणेच्या मर्यादा स्पष्ट करणारी व त्यातून मुक्त होण्यासाठी धर्मांतराची आवश्यकता प्रतिपादन करणारी आहेत. याचबरोबर बौद्ध धर्माची मूल्ये कोणती आहेत व त्यात समता, बंधुभाव व स्वातंत्र्य या त्रयींचा पाया कसा आहे, तो मानवमुक्तीसाठी किती आवश्यक आहे हे सांगणारे आहेत. काही भाषणे ही धर्मांतरानंतरची आहेत. यात वाराणसी, सारनाथ येथील भाषणांचा समावेश आहे. त्याचबरोबर धम्मदीक्षा या ऐतिहासिक घटनेच्या वेळी केलेले ऐतिहासिक भाषण व खाटमांडू येथे केलेले बौद्ध धर्म व मार्क्सवाद या विषयावर ऐतिहासिक भाषण केलेले आहे. धम्माचा मूलभूत विचार, त्याचे प्रयोजन, तो जीवनमार्ग व्यतित करताना पूर्वसंस्कारातून येणाऱ्या विसंगत कल्पना, रुढी यांचा धोका या साऱ्यांना तात्विक व व्यावहारिक पातळीवर केलेला विचार महत्त्वाचा आहे. विसाव्या शतकातील मार्क्सचे तत्त्वज्ञान व त्यातून झालेली रशियन क्रांती यामुळे कुठल्याही तत्त्वज्ञानाला त्यांच्याशी असलेले साम्य आणि वेगळेपण स्पष्ट करणे आवश्यक झाले होते. खाटमांडूच्या बौद्ध परिषदेत बाबासाहेबांनी केलेली बुद्ध व मार्क्सची तुलना यादृष्टीने महत्त्वाची आहे. या भाषणात बौद्ध धम्मात शोषणाचा विचार मार्क्सपिक्षा अधिक खोलवर जाऊन केल्याचा दावा केला आहे. एका दृष्टीने मार्क्सच्या विचारांशी साम्य सांगत बौद्ध धम्ममार्ग हा साम्यवादापेक्षा किती व्यापक आहे याची जाणीव त्यांनी करून दिली आहे. परिवर्तनाचा मार्ग धम्म असल्याची प्रचिती त्यातून येते. ही दोन्ही भाषणे खंडाच्या तिसऱ्या भागात समाविष्ट केली आहेत.
दुसऱ्या भागात दोन ऐतिहासिक भाषणे आहेत. ही भाषणे लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यापैकी १९३८ चे मनमाड येथील रेल्वे कर्मचारी परिषदेतील आहे. जाती व्यवस्थेत श्रम करणारा वर्ग एकत्र आला तरी त्याचे काही प्रश्न वेगळे राहतात व त्यामुळे त्याला स्वत:चे संघटन करणे क्रमप्राप्त कसे होते याचे विवेचन करीत कर्मचारी हा राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कसा उपयोगी असतो याची जाणीव त्यांनी कर्मचारीवगस करून दिली आहे. त्याबरोबरच आपली लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची कशी आहे, हे सांगून
( सतरा )